By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 12:25 IST
1 / 10छोट्या पडद्याच्या जगात रिअॅलिटी शोची खास क्रेझ आहे. प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांना खऱ्या आयुष्यात वेगळ्या स्टाईलमध्ये पाहायला आवडते. यामुळेच 'बिग बॉस' आणि 'खतरों के खिलाडी' सारखे शो लोकांमध्ये हिट राहिले आहेत. 'झलक दिखला जा ११' हा डान्स रिअॅलिटी शो लवकरच सुरू होणार आहे. 2 / 10मलायका अरोरा, अर्शद वारसी आणि फराह खान दिवाळीपूर्वी सुरू होणाऱ्या या डान्स रिअॅलिटी शोला जज करणार आहेत. रिअॅलिटी शो जज करण्यासाठी कलाकारांनी चांगलंच मानधन घेतले आहे.3 / 10'झलक दिखला जा' हा डान्स रिअॅलिटी शो प्रेक्षकांना आवडतो. लोकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांचे नृत्य कौशल्य पाहायला आवडते. हा रिअॅलिटी शो यावेळी ११ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या शोमध्ये १० सेलेब्स आपले कौशल्य दाखवतील. मलायका अरोरा, अर्शद वारसी आणि फराह खान स्पर्धकांच्या नृत्याचे परिक्षण करतील.4 / 10फराह खान बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर असून तिने अनेक हिट गाणी कोरिओग्राफ केली आहेत. यासोबतच ती दिग्दर्शनाच्या दुनियेतही रमली असून तिने 'ओम शांती ओम', 'मैं हूं ना' सारखे चित्रपट केले आहेत.5 / 10'झलक दिखला जा'मध्ये फराह स्पर्धकांच्या नृत्यातील बारकावे पाहणार आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर ती एका एपिसोडसाठी ५ लाख रुपये घेते. त्यानुसार पाहिले तर संपूर्ण सीझनमध्ये त्याला ६० लाख रुपये मिळतील.6 / 10अर्शद वारसीने आपल्या करिअरची सुरुवात कोरिओग्राफर म्हणून केली होती. 'झलक दिखला जा'च्या ११व्या सीझनमध्येही तो जजच्या भूमिकेत दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याला एका एपिसोडसाठी ८ लाख रुपये मिळत आहेत. म्हणजेच फी म्हणून त्याला जवळपास एक कोटी रुपये मिळतील. 7 / 10याआधी अर्शद वारसी 'जरा नचके देखा' आणि 'सबसे फेवरेट कौन'मध्ये दिसला आहे. 'असुर २' या वेबसीरिजमध्येही तो दिसला होता.8 / 10अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत असलेली मलायका अरोराची ब्रँड व्हॅल्यू जास्त आहे आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार,तिला एका एपिसोडसाठी १५ लाख रुपये मिळत आहेत. ती एका महिन्यात २ एपिसोड शूट करेल, म्हणजेच तिला ३० लाख रुपये मिळतील. त्यानुसार या सीझनमधून ती ३ कोटींहून जास्त कमावणार आहे. मलायका अरोरा नृत्यात पारंगत आहे आणि तिने अनेक वेळा चित्रपटांमध्ये आपले कौशल्य दाखवले आहे. तसेच तिने याआधी अनेक शोज जज केले आहेत.9 / 10'झलक दिखला जा'ची आतापर्यंत १० नावं समोर आली आहेत. यामध्ये उर्वशी ढोलकिया, तनिषा मुखर्जी, शोएब इब्राहिम, शिव ठाकरे, संगीता फोगट, राजीव ठाकूर, करुणा पांडे, अंजली आनंद, अद्रिजा सिन्हा आणि आमिर अली यांचा समावेश आहे. 10 / 10झलक दिखला जा शो गौहर खान आणि ऋत्विक धनजानी होस्ट करणार आहेत. त्याच वेळी, शोमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांना त्यांच्या ब्रँड व्हॅल्यूनुसार फी मिळत आहे.