90 कोटींचे दागिने, १३० कोटी रुपये बँकेत अन्...; जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती माहीत आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 12:40 IST
1 / 8बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री जया बच्चन या कायमच चर्चेत असतात. अभिनयाने त्यांनी एक काळ गाजवला. अभिनेत्री असण्याबरोबरच त्या समाजवादी पार्टीच्या खासदारही आहेत. 2 / 8जया बच्चन यांनी नुकतीच निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात त्यांच्या संपत्तीबाबत माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी अमिताभ बच्चन आणि त्यांच्या २०२२-२३ वर्षातील कमाईबाबत सांगितलं आहे. 3 / 8७५ वर्षांच्या जया बच्चन यांनी गेल्या वर्षात १ कोटी ६३ लाख रुपयांची कमाई केल्याचं यात म्हटलं आहे. तर अमिताभ बच्चन यांनी तब्बल २७३ कोटींची कमाई केली आहे. 4 / 8जया बच्चन यांच्या बँक खात्यात १० कोटी ११ लाख रुपये तर ५७ हजारांची रोकड आहे. बिग बी यांच्याकडे १२ लाखांची रोख रक्कम आणि १२० कोटी ४५ लाख रुपये बँक खात्यात जमा आहेत. 5 / 8शेअर्समध्ये जया बच्चन यांनी ५ कोटींची गुंतवणूक केली आहे. तर अमिताभ यांनी १८२ कोटींहून अधिक रक्कम शेअर्समध्ये गुंतवले आहेत. 6 / 8जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्याकडे अनुक्रमे ४०कोटी आणि ५४ कोटी किमतीचे दागिने आहेत. 7 / 8बच्चन दाम्पत्याकडे बीएमडब्लू, मर्सिडीज या लक्झरियस गाड्याही आहेत. बिग बींकडे १७ कोटींचं कार कलेक्शन आहे. तर जया बच्चन यांच्या नावे ९ लाखांची वाहने आहेत. 8 / 8जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती १ हजार ५७८ कोटी इतकी आहे.