Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रगलच्या काळात सुपरस्टार राजेश खन्नांचा AC रिपेअर केला; पुढे बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून नाव कमावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 13:39 IST

1 / 7
एक असा व्यक्ती, ज्याने बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून नाव कमावलं. पण स्ट्रगलच्या काळात या अभिनेत्याने चक्क एकदा राजेश खन्नांच्या घरी AC रिपेअर केला होता.
2 / 7
हा अभिनेता म्हणजे इरफान खान. इरफान आज अनेकांसाठी प्रेरणादायी अभिनेता आहे. आपल्या टॅलेंटच्या जोरावर इरफानने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अभिनयाचा डंका वाजवला.
3 / 7
इरफान खान जेव्हा अभिनयाचे स्वप्न घेऊन मुंबईत आला, तेव्हा त्याच्याकडे उदरनिर्वाहासाठी कोणतेही साधन नव्हते. त्यामुळे संघर्षाच्या दिवसात इरफानने अनेक छोटी मोठी कामं केली. अशातच एकदा AC रिपेअरचं काम घेताना इरफान थेट राजेश खन्नांच्या घरी पोहोचला होता.
4 / 7
इरफान खानने एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा तो राजेश खन्ना यांच्या घरी एसी ठीक करण्यासाठी गेला, तेव्हा 'काका' (राजेश खन्ना) यांना प्रत्यक्ष समोर पाहून तो भारावून गेला होता. सुपरस्टार अभिनेत्याला प्रत्यक्ष पाहताना इरफान चक्कर होऊन बेशुद्ध झाला होता.
5 / 7
इरफान खानने जयपूरमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिल्लीच्या 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'मध्ये प्रवेश घेतला. तिथून बाहेर पडल्यानंतर त्याने 'बनगी', 'चंद्रकांता' आणि 'भारत एक खोज' सारख्या अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम केले.
6 / 7
'मकबूल', 'पान सिंग तोमर', 'द लंचबॉक्स' आणि 'पिकू' यांसारख्या चित्रपटांतून इरफानने आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली. केवळ भारतच नाही, तर 'लाईफ ऑफ पाय', 'द अमेझिंग स्पायडरमॅन' आणि 'जुरासिक वर्ल्ड' सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांतून त्याने हॉलिवूडमध्येही स्वतःची ओळख निर्माण केली.
7 / 7
२०२० मध्ये कर्करोगाशी झुंज अपयशी ठरल्याने इरफान खानचे निधन झाले. 'अंग्रेजी मीडियम' हा इरफानचा शेवटचा चित्रपट होता.
टॅग्स :इरफान खानबॉलिवूडराजेश खन्नासेलिब्रिटी