Join us

PHOTOS : विजय देवरकोंडा जगतो अशी लक्झरी लाईफ, कधीकाळी भाडं द्यायला नव्हते पैसे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 15:39 IST

1 / 11
साऊथ सेन्सेशन विजय देवरकोंडा याची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. तरूणाईच्या गळ्यातील तो ताईत असलेला राऊडी आज साऊथचा सगळ्यात महागडा अभिनेता आहे.
2 / 11
या राऊडीचा थाटचं न्यारा. विजय देवरकोंडा अगदी अलिशान आयुष्य जगतो. त्याचे हे फोटो बघुन तुम्हीही थक्क व्हाल.
3 / 11
हैदराबादच्या अतिशय पॉश मानल्या जाणाऱ्या जुबली हिल्स भागात विजय देवरकोंडाचा बंगला आहे. याची किंमत 20 कोटींच्या घरात आहेत. याठिकाणी तो आई-बाबा व भावासोबत राहतो.
4 / 11
बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक स्टायलिश हिरो आहेत. पण विजय देवरकोंडाही कमी स्टायलिश नाही. लाईफ म्हणाल तर फुल्ल अलिशान. कधीकाळी याच विजय देवरकोंडाकडे घराचे भाडे द्यायला पैसे नव्हते. आज तो कोट्यवधींचा मालक आहे.
5 / 11
विजय लॅव्हिश घरात राहतो, अलिशान लक्झरी गाड्यांमधून फिरतो. त्याच्याकडे एकापेक्षा एक महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. रेंज रोव्हर, मर्सिडीज बेंझ, ऑडी अशा अनेक गाड्या त्याच्याकडे आहेत.
6 / 11
9 मे 1989 रोजी एका तेलगू कुटुंबात विजय देवरकोंडाचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव देवरकोंडा गोवर्धन राव आणि आईचे नाव माधवी देवरकोंडा आहे.
7 / 11
देवरकोंडा गोवर्धन राव हे दाक्षिणात्य छोट्या पडद्यावरील कलाकार आहेत. विजय देवरकोंडाच्या धाकट्या भावाचे नाव आनंद देवरकोंडा आहे.
8 / 11
विजय देवरकोंडाचे कुटुंब त्याला राऊडी नावाने हाक मारतात. यामुळेच त्याचे चाहते त्याला राउडी देखील म्हणतात.
9 / 11
2011 साली विजयने मध्ये दक्षिण सिनेमातून पदार्पण केलं. त्याच्या पहिल्या चित्रपटाचं नाव ‘नुव्विला’ असं होतं. हा एक मल्टीस्टारर चित्रपट होता.
10 / 11
यानंतर विजय देवरकोंडाने अनेक हिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. परंतु ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाने खरी ओळख मिळाली. तो भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनला.
11 / 11
हिल एंटरटेनमेंट असे त्याच्या प्रॉडक्शन कंपनीचं नाव आहे. याशिवाय ‘राउडी वेअर’ या नावाचा त्याचा क्लोदिंग ब्रँड आहे. एकेकाळी पैसे नसल्याने बँक अकाउंट सील झालेल्या विजयच्या खात्यात आज कोट्यवधी रुपये आहेत.
टॅग्स :विजय देवरकोंडाTollywood