Join us  

Abhijeet Sawant : इंडियन आयडॉल अभिजीत सावंतचे 'ति'च्यासोबत खास क्षण, म्हणाला '१५ वर्ष..'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2022 11:19 AM

1 / 8
अभिजीत सावंतच्या पत्नीचे नाव शिल्पा एडवणकर सावंत असे आहे. अभिजीत आणि शिल्पाच्या लग्नाला आज १५ वर्ष पूर्ण झालेत.
2 / 8
यानिमित्ताने अभिजीतने बायकोसोबतचे खास फोटो शेअर केलेत. हे तर फक्त १५ वर्षच असे त्याने पोस्ट मध्ये म्हणले आहे.
3 / 8
इंडियन आयडॉलमुळे अभिजीत घराघरात पोहोचला. त्याचा आवाज आजही प्रेक्षकांना भुरळ घालतो. इंडियन आयडॉल मुळे त्याला कमालीची प्रसिद्धी मिळाली. मात्र यानंतर तो बॉलिवुडमध्ये म्हणावे तसे यश त्याला मिळाले नाही.
4 / 8
सध्या अभिजीत अनेक लाईव्ह शो, कॉन्सर्ट्स करतो. आजही रसिक त्याला भरभरुन प्रतिसाद देतात.
5 / 8
अभिजीत एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला आहे. आजही तो अगदी साधाच राहतो हे या फोटोंमधुन दिसुन येते.
6 / 8
इंडियन आयडॉल चा विजेता झाल्यानंतर अभिजीतवर मीडियाचे फार लक्ष होते. त्याच्याबद्दल अनेक बातम्या छापून येत होतेया. अनेक जण त्याला ट्रोलही करत होते.
7 / 8
इंडियन आयडॉल चा विजेला अभिजीत सावंत आता कुठे गायब आहे असे विचारण्यात येऊ लागले. यावर त्याने सांगितले की मी खुप छोट्या कुटुंबातून येतो. इंटस्ट्रीत स्वत:ची जागा मिळवणे फार अवघड आहे.
8 / 8
अभिजीतला दोन गोंडस मुली आहेत. सध्या तो त्याच्या कुटुंबासोबत खुश आहे आणि त्याचे गाण्याचे करिअरही नीट सुरु आहे.
टॅग्स :अभिजीत सावंतपरिवारइंडियन आयडॉल