By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 15:41 IST
1 / 8‘इंडियन आयडल 12’ फेम सायली कांबळे गेल्या रविवारी लग्नबंधनात अडकली. प्रियकर धवलसोबत तिने लग्नाच्या आणाभाका घेतल्या. 2 / 8आता मिसेस धवल पाटीलने लग्नानंतरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.3 / 8गेल्या रविवारी महाराष्ट्रीय पद्धतीने अगदी थाटामाटात सायलीचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.4 / 8लग्नात सायली पिवळ्या रंगाच्या नऊवारीत दिसली होती. ताज्या फोटोंमध्ये ती जांभळ्या रंगाच्या पैठणीत कमालीची सुंदर दिसतेय.5 / 8हातात हिरवा चुडा, नाकात नथ, भांगात कुंकू अशा लुकमध्ये सायली तिच्या सासरच्या मंडळींसोबत दिसतेय.6 / 8 सायलीने हळदीचे आणि मेहंदीचे काही फोटो व व्हिडीओ शेअर केले होते. त्याआधी प्री-वेडिंग फोटोशूटची झलकही तिने दाखवली होती. प्री-वेडिंग फोटोशूट अनेक फोटो तिने शेअर केले होते. 7 / 8 सायली कांबळेने ‘इंडियन आयडल 12’ संपल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली देत, धवलसोबत आपल्या नात्याची अधीकृत घोषणा केली होती. 8 / 8‘इंडियन आयडल 12’मध्ये असताना सायलीच्या लव्ह लाईफची चर्चा अशीच रंगली होती. शोचा कंटेस्टंट निहाल तारोसोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं. पण हा केवळ शोचा टीआरपी वाढवण्यासाठीचा फंडा होता.