1 / 10कलाविश्वात रंगणाऱ्या ब्रेकअप, पॅचअप वा अफेअर्स या चर्चा कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाहीत. यामध्येच सध्या बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.2 / 10आतापर्यंत कलाविश्वातील अनेक अभिनेत्रींनी त्यांचा संसार मोडून त्या त्यांच्या जीवनात पुढच्या मार्गावर वळल्या आहेत. यात कोणी दुसरा संसार थाटला तर, काही जणी एकाकी जीवन जगत आहेत. यातलीच एक अभिनेत्री म्हणजे चाहत खन्ना.3 / 10 यात सध्या अनेक अभिनेत्री त्यांच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत आहे. कुमकुम, बडे अच्छे लगते हो अशा कितीतरी मालिकांमध्ये चाहत झळकली आहे.4 / 10पडद्यावर कायम हसतमुख असणाऱ्या चाहतने खऱ्या आयुष्यात अनेक दु:खांचा सामना केला आहे.5 / 10चाहतने दोन वेळा लग्न केलं. मात्र, दोन्ही वेळा तिचा संसार टिकला नाही. अखेर आज ती तिच्या दोन मुलींसोबत एकटी राहते.6 / 10चाहतने पहिलं लग्न वयाच्या २० व्या वर्षी केलं होतं. मात्र, हे लग्न केवळ ७ महिने टिकलं.7 / 10पहिला घटस्फोट झाल्यानंतर चाहतने बॉयफ्रेंड फरहान मिर्झासोबत २०१४ मध्ये लग्न केलं. मात्र, चाहत दुसऱ्यांदा प्रेग्नंट असतानाच तिच्या नवऱ्याने तिला घराबाहेर काढलं. त्यामुळे चाहतने २०१८ मध्ये फरहानपासूनही घटस्फोट घेतला.8 / 10विशेष म्हणजे एकाकी आयुष्य जगत असलेली चाहत सध्या प्रचंड लक्झरी लाइफ जगत आहे. 9 / 10सध्या चाहत मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत असून येथील अनेक बोल्ड, ग्लॅमरस फोटो ती शेअर करत आहे.10 / 10त्यामुळे घटस्फोटानंतर चाहत आणखीनच बोल्ड आणि ग्लॅमरस झाल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.