By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 10:02 IST
1 / 6हृतिक रोशन आणि सुझान खान हे बॉलिवूडमधील पॉवर कपल्सपैकी एक होते. या जोडप्याच्या लग्नाला जवळपास 14 वर्षे झाली होती. 2014 मध्ये जेव्हा या ह्रतिक सुझानने वेगळे होण्याची घोषणा केली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. या जोडप्याच्या घटस्फोटाला 4 वर्षे लागली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुझान खान हिने अभिनेत्याकडे 400 कोटी रुपयांची मोठी रक्कम मागितली होती. (फोटो-फाईल) 2 / 6बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानने पहिली पत्नी रीना दत्ता हिच्याशी १९८६ मध्ये लग्न केलं होतं. १६ वर्षांच्या संसारानंतर काडीमोड घेतला. घटस्फोटाच्या दरम्यान आमिर खानकडे त्याच्या एक्स पत्नीने ५० कोटी मागितले होते. (फोटो-फाईल) 3 / 6करिश्मा कपूरने बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले. लग्नाच्या 13 वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटस्फोटाच्या वेळी संजय कपूरने करिश्माला एक फ्लॅट दिला होता आणि 14 कोटी रुपयेही दिले होते. (फोटो-फाईल) 4 / 6अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी 1998 मध्ये लग्न केले होते. लग्नाआधी हे दोघे अनेक वर्षे एकमेकांना डेटही करत होते.18 वर्षे चांगल्या-वाईट काळात एकमेकांना साथ दिल्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटाच्या वेळी अरबाज खानने मलायका अरोराला 10 ते 15 कोटी रुपये दिले होते. (फोटो-फाईल) 5 / 6संजय दत्त आणि मॉडेल रिया पिल्लई यांचं लग्नही फार काळ टिकले नाही. रिया पिल्लई संजय दत्तची दुसरी पत्नी होती. 2005 मध्ये घटस्फोटानंतर रियाने संजय दत्तकडून घर आणि 8 कोटी रुपये घेतले. (फोटो-फाईल) 6 / 6अमृता सिंगने करिअर पीकवर असताना स्वत: पेक्षा १२ वर्षे लहान सैफ अली खानसोबत लग्न केलं हेतं. मात्र त्यांच्या संसार फार काळ टिकला नाही. १२ वर्षे लहान सैफसोबत घटस्फोट घेताना ५ कोटी रुपये मागितले होते. (फोटो-फाईल)