1 / 12हॉलिवूड सुपरस्टार जॉनी डेपच्या मानहानी केसमध्ये आता नवं वळण आलं आहे. गुरूवारी जॉनीची एक्स वाइफ आणि अभिनेत्री एम्बर हर्डने कोर्टात जॉनीवर अनेक गंभीर आरोप लावले. यादरम्यान एम्बरने अनेक त्रासदायक डिटेल्सचा खुलासा केला. 2 / 12एम्बरने जॉनीने तिला केलेली मारहाण ते लैंगिक शोषण करण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी कोर्टासमोर ठेवल्या. चला जाणून घेऊ एम्बर हर्ड काय म्हणाली.3 / 12गुरूवारी एम्बर हर्डने कोर्टासमोर सांगितलं की, २०१५ मध्ये जॉनीने कथितपणे तिच्यासोबत फारच भयावह काम केलं होतं. रडत रडत एम्बर म्हणाली की, ही घटना तिच्यासोबत लग्नानंतर ऑस्ट्रेलियात घडली होती. 4 / 12ती तिचा सिनेमा 'द डेनिश गर्ल' चं शूटींग पूर्ण करून जॉनी डेपकडे ऑस्ट्रेलियाला गेली होती. तिथे जॉनी 'पायरेट्स ऑफ द कॅरेबियन ५' चं शूटिंग करत होता. 5 / 12हर्डनुसार, जॉनीने तिला त्याच्यासोबत MDMA(ड्रग्स) घेण्यास सांगितलं होतं. पण तिने यासाठी नकार दिला होता. जॉनीने दारू प्यायला सुरूवात केली त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. 6 / 12एम्बरनुसार, दुसऱ्या दिवशी वाद आणखीनच पेटला. जॉनीने तिला धक्का देऊन भींतीवर ढकललं होतं आणि तिच्या चेहऱ्यासमोर फोन फोडला होता.7 / 12तिने सांगितलं की, त्यानंतर त्याने एका बॉटलने तिला घाबरवलं आणि ती बॉटल तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली. ज्यामुळे तिच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्त येऊ लागलं होतं. 8 / 12एम्बर हर्डनुसार, जॉनीच्या हातात दारूची एक फुटलेली बॉटल होती. जी त्याने ती तिच्या चेहऱ्याजवळ आणि गळ्याजवळ नेली होती. आणि तो म्हणाला होता की तो एम्बरला कापणार.9 / 12एम्बर हर्डने पुढे सांगितलं की, जॉनी डेप तिला चांगला माणूस वाटत होता. पण त्याचा राग फार भयानक होता. हा राग त्याला ड्रग्सच्या नशेत येत होता. तो एम्बरवर ती त्याला दगा देत असल्याचा आरोप करत होता. 10 / 12सोबतच हर्डने सांगितलं की, ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या घटनेनंतर काही महिन्यांनी जॉनीने तिच नाक तोडलं होतं. सोबतच भांडत असताना डोक्यावरचे काही केसही तोडले होते. हे सगळं त्यांच्या लॉस एंजलिसच्या घरात झालं.11 / 12याआधी एम्बर हर्डने जॉनी डेपसोबत झालेल्या पहिल्या भांडणाबाबत सांगितलं होतं. त्यावेळी ती म्हणाली होती की, कधी जॉनीने तिला पहिल्यांदा मारलं होतं. एम्बरनुसार, जॉनीने तिला त्याचा टॅटू विनो फॉरएवर वर हसण्यावरून मारलं होतं. 12 / 12२०१३ बाबत सांगताना एम्बर म्हणाली की, जॉनीने तिचे कपडे फाडून तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये कोकेन भरलं होतं. आता १६ मे रोजी पुन्हा एकदा एम्बर हर्ड कोर्टासमोर बोलणार आहे.