Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहे गोलशिफ्ते फराहानी? फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर जोडलं जातंय नाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 16:14 IST

1 / 11
फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या खासगी आयुष्याबद्दल सध्या जगभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
2 / 11
इमॅन्युएल मॅक्रॉन यांच नाव गोलशिफ्ते फराहानी या अभिनेत्रीशी जोडलं जात आहे.
3 / 11
इमॅन्युएल मॅक्रॉन आणि गोलशिफ्ते फराहानी यांच्यात कथितरित्या 'प्लॅटोनिक रिलेशनशिप' (शारीरिक आकर्षणाशिवाय असलेले मैत्रीपूर्ण नाते) असल्याचा दावा फ्रेंच मीडियाने केला आहे.
4 / 11
गोलशिफ्ते फराहानी ही इराणी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती तिच्या अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते.
5 / 11
CNN News18 ने दिलेल्या वृत्तानुसार, इमॅन्युएल मॅक्रॉन आणि गोलशिफ्ते फराहानी यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वैयक्तिक संवाद सुरू होता.
6 / 11
वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, गेल्या वर्षी फ्रान्सच्या फर्स्ट लेडी ब्रिगेट मॅक्रॉन यांना या संवादाबद्दल समजले, ज्यामुळे दोघांच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण झाला.
7 / 11
या खळबळजनक दाव्यांवर अद्याप अद्याप मॅक्रॉन यांचे कार्यालय किंवा अभिनेत्री गोलशिफ्ते फराहानी यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत नाव जोडलं गेल्यानं गोलशिफ्ते फराहानी सध्या इंटरनेटवर ट्रेंड होत आहे.
8 / 11
इराणमध्ये जन्मलेली फराहानी ही इराणी, फ्रेंच आणि हॉलिवूड चित्रपटांतील प्रसिद्ध चेहरा आहे. ती ज्येष्ठ अभिनेते बेझद फराहानी यांची मुलगी आहे.
9 / 11
गोलशिफ्ते फराहानीने 'बॉडी ऑफ लाइज' (हॉलिवूड), 'पॅटरसन' आणि अलिकडेच ख्रिस हेम्सवर्थसोबत 'एक्सट्रॅक्शन' (Extraction) या चित्रपटात 'निक खान'ची महत्त्वाची भूमिका साकारली.
10 / 11
२००८ मध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपटात काम करताना हिजाब परिधान करण्यास नकार दिल्यामुळे तिला इराणमधून निर्वासित व्हावे लागले होते. तेव्हापासून ती परदेशात राहत आहे.
11 / 11
दरम्यान फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन या त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत. त्या आधी शिक्षिका होत्या.
टॅग्स :सेलिब्रिटीफ्रान्सहॉलिवूडइराण