Join us

Hina Khan : "खूप वेदना, पैसे परत करणार होते..."; कॅन्सरशी लढणाऱ्या हिना खानने कोणाची मागितली माफी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 12:02 IST

1 / 11
'ये रिश्ता क्या कहलाता है' प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानने जेव्हा तिच्या स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सरची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. मात्र हिनाने ती कॅन्सरला घाबरणार नाही तर या आजाराशी लढणार आहे असं सांगितलं.
2 / 11
अभिनेत्रीची ही लढाई अनेक कॅन्सर रुग्णांना हिंमत देते, म्हणूनच ती आता तिच्या आजाराबाबत सोशल मीडियावर अनेक अपडेट्स शेअर करत असते. अलीकडेच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.
3 / 11
अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा हिची हिनाने माफी मागितली आहे. हिना खानने अकाउंटवर एका लांबलचक पोस्टसह एक व्हिडीओ शेअर केला आहे.
4 / 11
या व्हिडिओमध्ये हिना एक सुंदर साडी नेसली आहे, जेव्हा साडी नेसून लिफ्टच्या दिशेने जाणाऱ्या हिनाला विचारलं जातं की, तिने तिच्या साडीसोबत पायात काय घातलं आहे? तेव्हा ती तिने घातलेले शूज कॅमेऱ्याला दाखवते आणि म्हणते की, आजकाल ती अशीच काम करत आहे.
5 / 11
हार मानणार नाही, काम करणार आणि लढणार असंही अभिनेत्रीने म्हटलं आहे. ज्या फॅशन इव्हेंटसाठी हिनाने ही साडी परिधान करून रॅम्प वॉक केला होता त्याबद्दल अभिनेत्रीने आता सांगितलं आहे.
6 / 11
'काय दिवस होता, तुम्हा सर्वांना माहीत आहे की, या आजारामुळे मला बऱ्याच वेळा न्यूरोपॅथिक वेदनांचा सामना करावा लागतो. मी काही मिनिटांपेक्षा जास्त वेळ उभी राहू शकत नाही.'
7 / 11
'कॅन्सरच्या उपचारानंतर मला अशा अनेक साईड इफेक्ट्सला सामोरं जावं लागेल, याची मला पूर्ण जाणीव होती. मी वेदनांमुळे या कार्यक्रमात येण्यास नकार देणार होते, मला स्टेजवर दीड तास उभं राहावं लागेल.'
8 / 11
'हा विचार करूनच मला भीती वाटत होती. इव्हेंटचे सर्व पैसेही मी परत करणार होती. हा इव्हेंट मी करू शकणार नाही असं मला वाटत होतं. पण देवाच्या कृपेने मला या इव्हेंटमध्ये सहभागी होण्याची ताकद मिळाली.'
9 / 11
'खरं तर, माझ्या पायाखाली काहीतरी नरम गोष्ट असल्यास, मला उभं राहण्यास कमी त्रास होतो आणि म्हणूनच मी साडीखाली शूज घालण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला' असं हिनाने म्हटलं आहे.
10 / 11
अभिनेत्रीने या पोस्टमध्ये साडी नेसल्यावर शूज घालून साडीचा संपूर्ण लुक खराब केल्याबद्दल डिझायनर मसाबा गुप्ताची माफी मागितली आहे आणि तिच्या चाहत्यांना तिच्यासाठी प्रार्थना करत राहण्याचं आवाहनही केलं आहे.
11 / 11
टॅग्स :हिना खानकर्करोगटिव्ही कलाकार