'या' प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रींच्या खऱ्या आयुष्यातील हे आहेत लाइफ पार्टनर, जाणून घ्या याबद्दल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 14:24 IST
1 / 9 सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत गौरीच्या भूमिकेत अभिनेत्री गिरीजा प्रभू (Girija Prabhu) पाहायला मिळते आहे. या मालिकेतील जयदीप आणि गौरीची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावतो आहे. मात्र खऱ्या आयुष्यात गिरिजा प्रभू अद्याप सिंगल आहे.2 / 9प्रार्थना बेहरे (Prathana Behere) मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. सध्या ती माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत नेहाची भूमिका साकारताना दिसते आहे.3 / 9प्रार्थना बेहेरे खऱ्या आयुष्यात विवाहित आहे. तिच्या पतीचे नाव अभिषेक जावकर असे आहे. अभिषेक हादेखील लेखक-दिग्दर्शक आहे.4 / 9आई कुठे काय करते मालिकेने अल्पावधीतच रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत आईची भूमिका म्हणजेच अरूंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने (Madhurani Prabhulkar) साकारली आहे.5 / 9अरुंधतीच्या म्हणजेच मधुराणीच्या पतीचे नाव प्रमोद प्रभुलकर असे आहे.6 / 9मुलगी झाली हो या मालिकेत माऊची भूमिका अभिनेत्री दिव्या पुगावकर (Divya Pugaonkar) साकारते आहे. या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे.7 / 9दिव्या अक्षय घरत सोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. अक्षय हा फिटनेस ट्रेनर आणि न्यूट्रिशियन आहे.8 / 9मन उडू उडू या मालिकेमध्ये दिपुच्या भूमिकेमध्ये सध्या हृता दुर्गुळे (Hruta Durgule) पाहायला मिळते आहे. 9 / 9हृता दुर्गुळे ही सध्या प्रतिक शहा याला डेट करते आहे. प्रतीक अभिनेत्री मुग्धा शहा यांचा मुलगा आहे.