Join us  

गौरी इंगावलेच्या खऱ्या कुटुंबाला पाहिलंत का? गुढीपाडव्यानिमित्त शेअर केले Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 4:18 PM

1 / 8
मराठमोळी अभिनेत्री गौरी इंगावलेचा (Gauri Ingawale) 'ही अनोखी गाठ' नुकताच प्रदर्शित झाला. गौरीने 'पांघरुण','दे धक्का 2' या सिनेमांमध्येही दिसली.
2 / 8
गौरी इंगावले ही दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मानसकन्या आहे. त्यांनीच तिला या क्षेत्रात आणलं. त्यांच्यामुळेच तिच्यातील अभिनय, नृत्य या कलागुणांना वाव मिळाला.
3 / 8
गौरी महेश मांजरेकर यांनाच बाबा म्हणते तर मेधा मांजरेकर यांना आई. बहुतेक वेळा तर ती मांजरेकर कुटुंबासोबतच दिसते. तसंच सई मांजरेकर हिलाही ती बहीणच मानते. दोघींचा बाँडही खूप छान आहे हे अनेकदा फोटोंमधून समोर आलं.
4 / 8
असं असलं तरी गौरीचं खरं कुटुंब वेगळं आहे. काल गुढीपाडव्यानिमित्त गौरी आपल्या खऱ्या आईवडील आणि भावंडांसोबत दिसली. तिने कुटुंबासोबत सुंदर फोटोही शेअर केलेत.
5 / 8
गेल्या वर्षीच मे महिन्यात गौरीने नवी घर खरेदी केलं. आपल्या खऱ्या आईवडिलांच्या हस्ते तिने वास्तुशांत केली. याची झलक तिने सोशल मीडियावर दाखवली होती.
6 / 8
आता काल गुढीपाडवाही तिने आपल्या कुटुंबासोबत साजरा केला. यावेळी गौरीने निळ्या-गुलाबी रंगाची काठापदराची साडी नेसली होती. नथ, गळ्यात हार असा साजेसा लूक तिने केला होता.
7 / 8
यामध्ये तिने आपल्या सख्ख्या बहिणीसोबतही फोटो शेअर केला आहे. तिच्या बहिणीचं नाव गार्गी आहे. गार्गी जिम्नॅस्टिक्समध्ये निपूण आहे.
8 / 8
शिवाय गौरीने आईवडिलांसोबतचाही सुंदर फोटो शेअर केला आहे. ती अगदी तिच्या वडिलांवरच गेल्याचं फोटोमधून जाणवतं. गौरीचं हे सुंदर कुटुंब पाहून नेटकऱ्यांनीही कमेंट करत कौतुक केलं आहे.
टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीपरिवारमराठी चित्रपट