PICS : एकदम कडक!अमिताभपासून आलियापर्यंत सेलिब्रिटींनी असे केले नववर्षाचे स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 12:22 IST
1 / 11 महानायक अमिताभ बच्चन यांनी कुटुंबासोबत नवीन वर्षाचे स्वागत केले. यावेळी त्यांचा उत्साह अगदी तरूणांना लाजवणार होता. अमिताभ बच्चन यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी स्टाइलिश चष्मा आणि डोक्यावर टोपी घातलेली दिसत आहे. हा फोटो शेअर करताना अमिताभ यांनी चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.2 / 11ऐश्वर्या बच्चन हिने देखील कुटुंबासोबत 2021 चे स्वागत केले. लेक आराध्यासोबतचा एक सुंदर फोटो शेअर करत तिने चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.3 / 11करिना कपूरने मुलगा तैमूर व पती सैफ अली खानसोबत असे सेलिब्रेट करत नववर्षाचे स्वागत केले.4 / 11ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारसोबत न्यू ईअर साजरा केला. अक्षयसोबतचा फोटो शेअर करत तिने चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.5 / 11मलायका अरोरा गोव्यात आहे. सोबत कोण तर बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूर. गोव्यातील एक सुंदर फोटो शेअर करत तिने नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.6 / 11आलिया भट सध्या बॉयफ्रेन्ड रणबीर कपूर व त्याच्या कुटुंबासोबत रणथंबोरला आहे. येथे आलियाने असे दणक्यात नव्या वर्षाचे स्वागत केले.7 / 11करिश्मा कपूरचा न्यू ईअर दणक्यात साजरा झाला. या फोटोवरून तुम्ही अंदाज बांधूच शकता.8 / 11सुनील शेट्टी यांनी पत्नीसोबत नवे वर्ष साजरे केले.9 / 11सारा अली खानने तिचा भाऊ इब्राहिमसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘ भावासोबत नवीन वर्ष साजरे करणे नेहमीच मजेदार आहे. तो माझ्या सर्व भीती दूर करतो’, असे लिहित कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.10 / 11ईशान खट्टरनेही अशा थाटात मावळत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत केले.11 / 11सोनम कपूरने पती आनंदला किस करताना फोटो शेअर करत न्यू ईअर विश केले.