गुरमीत-देबिनानं दिली GOOD NEWS, लग्नाच्या 11 वर्षानंतर घरी हलणार पाळणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 14:37 IST
1 / 8टीव्हीचा लोकप्रिय अभिनेता गुरमीत चौधरी व अभिनेत्री देबिना बॅनर्जी लवकरच आईबाबा बनणार आहेत. 2 / 8गुरमीतने स्वत: ही गुडन्यूज सोशल मीडियावर शेअर केली आहे. गुरमीतने त्याचा व देबिनाचा एक फोटो इन्स्टावर पोस्ट केला आहे. यात देबिना बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसतेय.3 / 8आता आम्ही दोनाचे तीन होणार आहोत. ज्युनिअर चौधरी येतोय. तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, असं कॅप्शन गुरमीतने या फोटोला दिलं आहे. लग्नाच्या 11 वर्षानंतर आईबाबा बनणार असल्याने गुरमीत व देबिना चांगलेच खूश आहेत.4 / 8छोट्या पडद्यावर गाजलेल्या ‘रामायण’ या मालिकेत गुरमीत चौधरीने प्रभू श्रीरामाची तर त्याची पत्नी देबिनाने सीता मातेची भूमिका साकारली होती. या मालिकेच्या सेटवर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. 5 / 82006 मध्ये देबिना व गुरमीत यांनी घरून पळून जाऊन लग्न केलं होतं. गुरमीतने या लग्नाचे काही फोटो शेअर केले होते. यानंतर 2011 साली गुरमीत व देबिना यांनी पुन्हा लग्न केलं. कुटुंबीयांच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीनं हे लग्न पार पडलं होतं.6 / 8 गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये देबिना व गुरमीत यांनी पुन्हा एकदा बंगाली रितीरिवाजाने लग्न केलं होतं. सुंदर जोडप्याच्या या तिसºया लग्नाचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते.7 / 8गुरमीतबद्दल सांगायचे तर मायावी, रामायण, गीत अशा अनेक मालिकांत काम केल्यानंतर तो मोठ्या पडद्याकडे वळला. कोई आप सा या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला.8 / 8 यानंतर खामोशियां, मिस्टर एक्स, वजह तुम हो,लाली की शादी में लड्डू दीवाना, पलटन आदी चित्रपटांत तो दिसला.