Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gudi Padwa 2026: पैठणी साडीत गुढी पाडव्यासाठी सजल्या बॉलिवूड अभिनेत्री, फोटोंवरुन हटणार नाही नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 16:02 IST

1 / 7
जान्हवी कपूरची लाल पैठणी साडी खूपच आकर्षक आहे. मॉडर्न ब्लाऊज आणि सॉफ्ट मेकअपमुळे जान्हवीचा लुक खास ठरतो. जान्हवी मॉडर्न आणि ट्रेडिशनल आउटफिटमध्ये किती सुंदर दिसते, हेच यातून पाहायला मिळतं.
2 / 7
भरजरी दागिने, मोत्यांची नथ आणि साजश्रृंगार करुन जिनिलीया देशमुख गुढीपाडव्यासाठी सज्ज आहे. तिचा हा लूक तरुणींसह महिलावर्ग नक्कीच फॉलो करु शकतात यात शंका नाही.
3 / 7
विद्या बालनने हिरव्या पैठणीसह भगव्या रंगाचा पदर असलेली सुंदर साडी नेसली आहे. साडीमधील नक्षीकाम आणि पारंपरिक दागिन्यांसह विद्याचा खूप देखणा आणि पारंपरित वाटतोय.
4 / 7
आलिया भटने पीच आणि पिंक शेड्समध्ये पैठणी साडीला एक नवीन आणि आकर्षक लुक दिला आहे. मिनिमल स्टाइलिंगमुळे आलियाची की खास स्टाइल खूपच फ्रेश वाटतेय.
5 / 7
श्रद्धा कपूरने जांभळ्या पैठणी साडीत साधा पण रॉयल लुक साकारला आहे. हलक्या दागिन्यांसह श्रद्धाचा लूक जरी साधासुधा असली तरीही या लूकमध्ये ती खूप आकर्षक दिसतेय.
6 / 7
हिरवी साडी, लाल रंगाचा पदर आणि त्यावर मोराची नक्षी असलेली साडी मृणाल ठाकूरवर खूप खुलुन दिसतेय. मृणाल ठाकूरने परिधान केलेली नथ तिच्या लूकवर खुलून दिसतेय.
7 / 7
माधुरी दीक्षितची पिवळी पैठणी गुढीपाडव्याच्या उत्सवी वातावरणाला साजेशी आहे. नथ, गजरा आणि सोन्याचे दागिने माधुरीच्या लुकला एकदम महाराष्ट्रीयन टच देतात.
टॅग्स :विद्या बालनजेनेलिया डिसूजाश्रद्धा कपूरजान्हवी कपूरमाधुरी दिक्षितमृणाल ठाकूरगुढीपाडवा 2026गुढीपाडवाव्हायरल फोटोज्