स्टार असूनही रिंकू राहते साध्याशा घरात; पाहा तिच्या अकलूजच्या घराची झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 15:16 IST
1 / 12सैराट या सिनेमातून तुफान लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु. आज रिंकूचं नाव प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत घेतलं जातं.2 / 12सैराटनंतर रिंकूने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं. लवकरच ती झिम्मा २ या सिनेमामध्ये दिसणार आहे. त्यामुळे ती चर्चेत येत आहे.3 / 12यश आणि प्रसिद्धी उपभोगणारी रिंकू खऱ्या आयुष्यात प्रचंड साधी आहे. आजही ती अत्यंत साधेपणाने मध्यमवर्गीय जीवन जगते. त्यामुळेच तिचं अकलूजमधील घर कसं आहे ते पाहुयात.4 / 12अकलूजमध्ये रिंकू तिच्या आई-वडील, धाकटा भाऊ आणि आजी-आजोबांसोबत रिंकू राहते. अकलूजच्या संग्राम नगर येथे रिंकूचे घर आहे.5 / 12रिंकूचे आई-वडील दोघंही शिक्षक आहेत. रिंकूच्या वडिलांनी काही वर्षांपूर्वीच संग्राम नगर येथे मोठा बंगला बांधला.6 / 12संग्रामनगरमध्ये राहण्यापूर्वी रिंकू राऊत नगरमध्ये राहत होती. रिंकू सहा वर्षांची असताना तिच्या वडिलांनी संग्राम नगरमध्ये नवीन घर बांधलं.7 / 12त्यांचे हे घर दुमजली आहे. वरती आणि खाली चार-चार खोल्या आहेत.8 / 12घराजवळ अनेक प्रकारची झाडं-झुडपंही लावली आहेत. नारळ, आंबा, पेरु आणि वेगवेगळ्या फुलांची भरपूर झाडं आहेत.9 / 12रिंकूला चित्रकलेची आवड आहे घराच्या भिंतींवर रिंकूने स्वतः पेंट केलेले फोटो लावल्याचे पाहायला मिळतंय.10 / 12रिंकू बऱ्याचदा त्यांच्या घराच्या टेरेसवर तिचं फोटोशूट करत असते.11 / 12रिंकू फावल्यावेळात घरातल्यांसाठी स्वयंपाकही करते.12 / 12रिंकूच्या घरचं किचन हे अगदी साध्या पद्धतीचं आहे. तिथे कुठेही मॉर्डन किचन वा मॉड्युलर किचन वगैरे नाही.