डोलू आणि...; रितेश-जेनेलियाची टोपणनावं माहितीयेत का? एकमेकांना या नावाने मारतात हाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 16:25 IST
1 / 10महाराष्ट्राचं लाडकं कपल म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख. २०१२ मध्ये या जोडीने लग्नगाठ बांधली आणि आजपर्यंत सुखाने संसार करत आहेत.2 / 10कलाविश्वातील आदर्श जोडपं म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं.3 / 10रितेश-जेनेलिया यांच्याविषयी कोणतीही माहिती असली तरीदेखील ती वाऱ्यासारखी पसरते.4 / 10रितेश आणि जेनेलिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत. त्यामुळे बऱ्याचदा ते एकमेकांसोबतचे फनी व्हिडीओ शेअर करत असतात.5 / 10सध्या जेनेलिया तिच्या ट्रायल पीरियड या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यानिमित्ताने तिने एक मुलाखत दिली.6 / 10जेनेलियाने अलिकडचे झूम वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल आयुष्यावर भाष्य केलं.7 / 10या मुलाखतीमध्ये तिने रितेश आणि ती एकमेकांना कोणत्या टोपणनावाने हाक मारतात हे सुद्धा सांगितलं.8 / 10रितेश जेनेलियाला जीन्स या टोपणनावाने हाक मारतो. या नावामुळे त्यांच्या घरात खूप गोंधळ झाला होता. या नावामागचा अर्थ कोणाचा ठिकसा माहित नाही.9 / 10तर, जेनेलियादेखील रितेशला एका खास नावाने हाक मारते. ती रितेशला डोलू या नावाने हाक मारते.10 / 10अलिकडेच या दोघांचा वेड हा सिनेमा रिलीज झाला. त्यानंतर रितेश लवकरच ‘हाऊसफुल्ल ५’ मध्ये दिसणार आहे. तर, जेनेलियाचा ‘ट्रायल पीरियड’ हा चित्रपट २१ जुलै रोजी प्रदर्शित झाला.