Bigg Boss 16 : मान्या सिंग ‘बिग बॉस 16’ची पहिली कन्फर्म स्पर्धक? नेमकी आहे तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 16:53 IST
1 / 8छोट्या पडद्यावरचा सर्वाधिक वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बिग बॉस 16’ची सध्या जोरदार चर्चा आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून हा शो सुरू होतोय. साहजिकच बिग बॉसच्या घरात यंदा कोण कोण जाणार, याची चर्चा रंगली आहे. एक नाव फारच चर्चेत आहे.2 / 8होय, फेमिना मिस इंडिया 2020 ची उपविजेती मान्या सिंग यावेळी बिग बॉसच्या घरात जाणार असल्याचं जवळजवळ कन्फर्म मानलं जात आहे.3 / 8मान्याच्या बिग बॉसमधील एन्ट्रीबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र सोशल मीडियावर तिच्या नावाची जोरदार चर्चा आहे. ही मान्या सिंग आहे तरी कोण, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.4 / 82020मध्ये मान्या सिंहचे मिस- इंडिया होण्याचे स्वप्न भलेही भंगले. पण मान्या सिंहच्या संघर्षाची कहाणी ऐकून अनेकांचे डोळे पाणावले होते. तिचा खडतर प्रवास आणि प्रबळ इच्छाशक्तीचे प्रत्येकाने कौतुक केले होते.5 / 8इच्छाशक्ती असली की माणूस काहीही करू शकतो, हे संपूर्ण जगाला तिने दाखवून दिले. मिस इंडिया स्पर्धेत मान्या फर्स्ट रनरअप ठरली.6 / 8 मान्या कोण तर साध्या ऑटोरिक्षा चालकाची लेक पण स्वप्न आणि ती पूर्ण करण्याची जिद्द अफाट. 14 वर्षांची असताना मान्या घरातून पळाली. दिवसा अभ्यास, संध्याकाळी भांडी घासून आणि रात्री कॉल सेंटरमध्ये काम करून तगली. 7 / 8रिक्षाचे भाडे वाचवण्यासाठी तासन् तास चालणारी, आईची दागिणे गहाण ठेवून शाळेची फी भरणारी हीच मान्या मिस इंडियाच्या मंचावर पोहोचली आणि जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे तिने सिद्ध केले. 8 / 8 माझे रक्त, माझा घाम आणि माझ्या डोळ्यांतील अश्रू हेच माझ्या आत्म्यासाठी अन्न ठरले आणि मी स्वप्न पाहण्याची हिंमत करू शकले. खूप कमी वयात मी नोकरी करू लागले. आईवडिलांनी मोठ्या कष्टाने मला शिकवले. मी आज जी काही आहे, त्यांच्यामुळे आहे, असे मान्या म्हणाली होती.