Join us
Daily Top 2Weekly Top 5

जगातील ‘ही’ सर्वात सुंदर सुपरमॉडल 50 व्या वर्षी बनली आई, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 13:10 IST

1 / 10
सुपरमॉडल नाओमी कॅम्बबेल रँपवर उतरते तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळतात. तिची प्रत्येक अदा लोकांना वेड लावते. ही नाओमी वयाच्या 50 व्या वर्षी आई बनली आहे.
2 / 10
होय, पन्नासीच्या नाओमीने एका मुलीला जन्म दिला आहे. या वयात नाओमी आई झाल्याचे ऐकून चाहतेही हैराण आहेत.
3 / 10
‘नो फिल्टर विद नाओमी’ या युट्यूब शोमध्ये खुद्द नाओमीने हा खुलासा केला. लॉकडाऊन माझ्यासाठी खूप खास राहिला. यादरम्यान मी माझ्या मुलीला जन्म दिला, असे तिने सांगितले.
4 / 10
या वयात आई बनण्याचा निर्णय कसा घेतला? असे विचारले असता ती म्हणाली, तिशीपर्यंत आई व्हायचे की नाही, याबद्दल मी विचारच केला नव्हता. पण लॉकडाऊनच्या काळात आयुष्यात काय महत्त्वाचे आहे, याचा विचार करणे भाग होते.
5 / 10
आधी मी सिंगल राहायचे, असेच ठरवले होते. पण नंतर आयव्हीएफद्वारे आई बनण्याचा निर्णय घेतला, असे तिने सांगितले.आई झाल्याची बातमी नाओमीने सोशल मीडियावर शेअर केली होती. मुलीचा व्हिडीओ तिने शेअर केला होता.
6 / 10
आई बनून मी खूप विनम्र झालेय, असे तिने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले होते. जगातील सर्वाधिक सुंदर मॉडेल म्हणून ओळखली जाणारी नामोअी तिच्या रागासाठीही ओळखली जाते. चार वेळा तिच्यावर सहका-यांना मारहाण केल्याचा आरोप लागला आहे.
7 / 10
नाओमी ही एक ब्रिटीश मॉडेल आहे. वयाच्या 15 वर्षीच फॅशन इंडस्ट्रीत आलेल्या नाओमीने फार कमी वेळात या क्षेत्रात स्वत:चा दबदबा निर्माण केला.
8 / 10
नाओमीने कधीच तिच्या वडिलांना पाहिले नाही. ती गर्भात असताना तिचे वडिल तिच्या आईला सोडून निघून गेले होते. पुढे नाओमीने तिच्या सावत्र वडिलांचे आडनाव स्वीकारले.
9 / 10
वयाच्या सातव्या वर्षी तिने तिचा पहिला पब्लिक अपीअरन्स दिला होता. 16 व्या वाढदिवसाला ती पहिल्यांदा ब्रिटीश मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकली होती.
10 / 10
डिसेंबर 1987 साली नाओमी ब्रिटीश वोग मॅगझिनच्या कव्हर पेजवर दिसली. 1966 नंतर या मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकलेली ती पहिली ब्लॅक कव्हर गर्ल होती.
टॅग्स :हॉलिवूड