Join us
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्या वडिलांसोबत काम करु नका'; एकता कपूरची अभिनेत्रींना तंबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 16:30 IST

1 / 7
टीव्ही क्वीन या नावाने प्रसिद्ध असलेली निर्माती म्हणजे एकता कपूर. आजवरच्या कारकिर्दीत एकताच्या असंख्य मालिका गाजल्या आहेत. यात क्युँ की सास भी कभी बहू थी, कसोटी जिंदगी की अशा किती तरी मालिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.
2 / 7
सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या एकताने अलिकडेच द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिच्यासोबत वडील आणि प्रसिद्ध अभिनेता जितेंद्रदेखील होते.
3 / 7
'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमात जितेंद्र यांनी एकताविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. इतकंच नाही तर ती वडिलांच्या बाबतीत जास्त पझेसिव्ह असल्याचंदेखील जितेंद्र यांनी सांगितलं. यावेळी एकताचा बालपणीचा किस्साही त्यांनी शेअर केला.
4 / 7
बऱ्याचदा सेलिब्रिटी त्यांच्या चित्रीकरणाच्या सेटवर मुलांना घेऊन जातात. परंतु, जितेंद्र यांनी कधीही एकताला सोबत नेलं नाही असं स्पष्ट केलं. विशेष म्हणजे यामागचं खरं कारणही एकताने स्वत: सांगितलं.
5 / 7
'माझ्या वडिलांसोबत कोणत्याही अभिनेत्रीने काम केलं की मला फार राग यायचा. त्यांच्यासोबत कोणत्याही अभिनेत्रीने काम करु नये असंच मला वाटायचं. त्यामुळे मी जर त्यांच्यासोबत कोणती अभिनेत्री दिसली की तिच्यावर हल्ला करायचे', असं एकता म्हणाली.
6 / 7
पुढे ती म्हणते, 'माझ्या याच स्वभावामुळे वडिलांनी मला कधीच कोणत्या शुटींगसाठी नेलं नाही.' एक प्रकारे लहान असताना एकता सगळ्या अभिनेत्रींना जितेंद्रसोबत काम करु नका अशी तंबीच देत होती.
7 / 7
गेल्या ५० वर्षांपासून जितेंद्र कलाविश्वात सक्रीय असून त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. गेल्या वर्षी एकता कपूरच्या ऑल्ट बालाजीअंतर्गत त्यांनी डिजिटल डेब्यू केला आहे. (फोटो सौजन्य: एकता कपूर फेसबुक पेज)
टॅग्स :एकता कपूरटेलिव्हिजनवेबसीरिजसिनेमासेलिब्रिटी