1 / 14बॉलिवूडचे दिग्गज सुपरस्टार जितेंद्र आणि शोभा कपूर यांची मुलगी एकता कपूर हे इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. टेलिव्हिजन क्वीन एकता कपूर आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. 48 वर्षीय चित्रपट आणि टीव्ही शो मेकरने आजपर्यंत लग्न केलेले नाही. एकताने यामागे हैराण करणारं कारण सांगितलं होतं.2 / 14एकता कपूर ही एक टेलिव्हिजन आणि फिल्म निर्माती, दिग्दर्शक आणि बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडची संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आहे. बॅचलर स्टारच्या यादीत तिचे नावही सामील आहे. चित्रपट निर्मातीने एका मुलाखतीदरम्यान मोठा खुलासा केला होता की तिने आजपर्यंत लग्न का केलं नाही?. 3 / 14जेव्हा एकता कपूरला विचारण्यात आले की ती लग्न कधी करणार? याला उत्तर देताना एकता कपूरने हसत हसत सांगितलं की, जेव्हा सलमान खान लग्न करेल तेव्हा. मुलाखतीत खुलासा करताना एकताने लग्नाबाबत सांगितले होतं की, तिच्या वडिलांनी तिला लग्न करता येणार नाही अशी अट घातली होती. 4 / 14एकता म्हणाली, 'वडिलांनी मला सांगितलं होतं की, एकतर तुला लग्न करावं लागेल किंवा कामावर लक्ष केंद्रित करावं लागेल. त्यानंतर मी काम निवडलं, लग्न केलं नाही.' एकता कपूर यांनी हे स्पष्टच सांगितलं.5 / 14'माझे अनेक मित्र आहेत ज्यांचं लग्न झालं होतं, पण आता ते सिंगल आहेत. गेल्या काही वर्षांत, मी अनेक घटस्फोट होताना पाहिले आहेत आणि मला वाटतं की माझ्यात संयम आहे, म्हणूनच मी अजूनही योग्य व्यक्तीची वाट पाहत आहे' असंही म्हटलं आहे. 6 / 14एकता कपूर लक्झरी लाईफस्टाईल जगते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2021 मध्ये एकताची एकूण संपत्ती 95 कोटी रुपये होती. तिची महिन्याची कमाई 1 कोटींहून अधिक आहे. गेल्या काही वर्षांत एकता कपूरच्या संपत्तीत बरीच वाढ झाली आहे. 7 / 14मुंबईत आलिशान घर आहे. ज्याची किंमत 7 कोटी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर तिच्याकडे परदेशातही अनेक आलिशान वाहने आणि मालमत्ता आहेत. ती एका गोड मुलाची आई देखील झाली आहे. 8 / 14काही महिन्यांपूर्वी चंकी पांडेला बर्थ विश करत एकता कपूरने एक इन्स्टास्टोरी शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने चंकीसोबतचा एक जुना फोटो शेअर केला. या फोटोवर लिहिलेल्या वाक्यांनी मात्र सगळ्याच्याच भुवया उंचावल्या. 9 / 14‘जेव्हा मी चंकी पांडेला पाहून ब्लश करायची, त्याने रिअॅक्ट केलं असतं तर मी सुद्धा आज बॉलिवूड वाईफपैकी एक असती, हॅपी बर्थ डे,’असं तिने या फोटोंवर लिहिलं. या फोटोतील ओळींनी अनेकांना हैराण केलं होतं.10 / 14टेलिव्हिजन क्षेत्रातील सर्वात मोठं आणि प्रसिद्ध नाव म्हणजे एकता कपूर. आजवरच्या कारकिर्दीत एकताने अनेक गाजलेल्या मालिकांची निर्मिती केली आहे. त्यामुळे छोट्या पडद्यावर तिचा कायमच बोलबाला असतो. एकताच्या प्रत्येक मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. 11 / 14'क्योंकी सास भी कभी बहू थी', 'कहानी घर घर की', 'कसौटी जिंदगी की', 'बडे अच्छे लगते है', यासारख्या असंख्य मालिका विशेष गाजल्या. परंतु, हिंदी कलाविश्वात दिग्दर्शिका, निर्माती म्हणून नाव कमावणारी एकता एका मराठमोळ्या अभिनेत्यामुळे या यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. एका मुलाखतीत तिने स्वत: याविषयी भाष्य केलं.12 / 14हिंदी कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या एकताच्या या प्रवासात लोकप्रिय मराठी अभिनेता अशोक सराफ यांचा मोलाचा वाटा आहे. विशेष म्हणजे एकता आणि अशोक सराफ यांच्या या मैत्रीच्या नात्याविषयी फार कमी लोकांना ठावूक आहे.13 / 14'बऱ्याचदा या मालिकेतील संवाद अत्यंत साधे होते. परंतु, आपल्या अनुभव आणि अभिनयाच्या जोरावर अशोक सराफ यांनी या संवादाचं विनोदात रुपांतर केलं. हम पांच या मालिकेला मिळालेल्या यशामुळे अनेक निर्मात्यांनी माझ्यावर विश्वास दाखवत माझ्या मालिकांमध्ये पैसे गुंतवण्यास सुरुवात केली', असं एकता म्हणाली होती.14 / 14एकता कपूर आज टेलिव्हिजनची क्वीन आहे. बालाजी टेलिफिल्म या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत ती मालिकांची निर्मिती करत असते. विशेष म्हणजे तिच्या मालिकांमध्ये ब्रेक मिळालेले किती तरी कलाकार आज रुपेरी पडद्यावर झळकत आहेत.