Join us
Daily Top 2Weekly Top 5

"नानाची डार्क साईड मी पाहिली..." नाना पाटेकरांबद्दल असं का म्हणाल्या होत्या डिंपल कपाडिया?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 15:39 IST

1 / 8
आज बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) यांचा 66वा जन्मदिवस आहे. हिंदी इंडस्ट्रीत त्यांनी एक काळ गाजवला आहे. त्यांनी आपल्या करिअरमध्ये बऱ्याच अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. त्यातलेच एक आहेत नाना पाटेकर
2 / 8
नाना पाटेकर (Nana Patekar) आणि डिंपल कपाडिया यांनी 'प्रहार : द फायनल अॅटॅक' या सिनेमात पहिल्यांदा सोबत काम केलं होतं. डिंपल कपाडिया नाना पाटेकरांबाबत एक विधान केलं होतं ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.
3 / 8
'प्रहार' सिनेमानंतर डिंपल आणि नाना यांनी अंगार, क्रांतीवीर या सिनेमातही एकत्र काम केलं. याशिवाय 2010 मध्ये 'तुम मिलो तो सही' या सुनील शेट्टीच्या सिनेमातही ते एकत्र दिसले.
4 / 8
याच सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान डिंपल यांनी नाना पाटेकरांबद्दल एक वक्तव्य केलं होतं. त्या म्हणाल्या, 'तो मला खूपच घृणास्पद वाटतो. चांगल्या आणि वाईट अर्थाने. त्याच्या टॅलेंटबद्दल बोलायचं तर त्याचा कोणीच हात धरु शकत नाही. तो खूपच टॅलेंटेड आहे. त्याच्यासारखी हुशारी पाहिली तर १०० खूनही माफ आहेत.'
5 / 8
'दयाळू आणि एक चांगला मित्र. त्याच्यासाठी सगळं माफ. माझा जीव घेतला तरी चालेल. पण मी त्याची डार्क साईडही पाहिली आहे. आपली प्रत्येकाचीच एक एक काळी बाजू असते जी आपण सुरक्षित रुपात लपवून ठेवतो. नानाची तीच बाजू मी स्वत: पाहिली आहे म्हणूनच मला तो किळसवाणा वाटतो.'
6 / 8
डिंपल कपाडिया यांनी 1973 साली ऋषि कपूरसह बॉबी सिनेमातून फिल्मी करिअरला सुरुवात केली. यानंतर त्यांनी लगेच राजेश खन्नासोबत लग्न केले. संसारात लक्ष द्यायचं म्हणून त्यांनी लगेच अभिनयातून ब्रेक घेतला.
7 / 8
यानंतर त्यांनी रमेश सिप्पी यांच्या 'सागर' सिनेमातून पुनरामगन केले. ती एक क्लासिक फिल्म होती. पुढे त्यांनी 'जांबाज', 'काश', 'जखमी औरत' चित्रपटांमध्ये भूमिका केली.
8 / 8
तर आजही ६६ व्या वर्षी डिंपल कपाडिया काम करत आहेत. फीमेल सेंट्रिक अॅक्शन ड्रामा सीरीज 'सास बहू और फ्लेमिंगो' मध्ये त्यांनी काम केले. याशिवाय रणबीर कपूर स्टारर 'तू झुठी मै मक्कार' आणि शाहरुखच्या ब्लॉकबस्टर 'पठाण' सिनेमात त्यांनी काम केले.
टॅग्स :डिम्पल कपाडियानाना पाटेकरबॉलिवूड