By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 06:00 IST
1 / 11'अगंबाई सासूबाई' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे उमा ऋषिकेश.2 / 11उमा ऋषिकेश असं सोशल मीडियावर नाव लावणाऱ्या या अभिनेत्रीचं खरं नाव उमा पेंढारकर आहे.3 / 11या मालिकेत उमाने सोहमच्या पत्नीची म्हणजेच शुभ्राची भूमिका साकारली होती.4 / 11उत्तम अभिनयासह स्वभावातील नम्रपणामुळे उमा विशेष लोकप्रिय झाली.5 / 11अग्गंबाई सासूबाई व्यतिरिक्त उमाने काही गाजलेल्या ऐतिहासिक मालिकांमध्येही काम केलं आहे.6 / 11सध्या सोशल मीडियावर उमाच्या नवऱ्याची चर्चा रंगली आहे. तिचा नवरा कलाविश्वापासून दूर असल्याचं पाहायला मिळतं.7 / 11उमा पेंढारकरच्या नवऱ्याचं नाव ऋषिकेश पेंढारकर असून तो एक आर्टिटेक आहे. तसंच त्यालादेखील शास्त्रीय संगीताची आवड आहे.8 / 11ऋषिकेशला फिरण्याची प्रचंड आवड असून तो बऱ्याचदा नवनवीन ठिकाणांना भेट देत असतो.9 / 11ऋषिकेश सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रीय आहे.10 / 11उमाने मुंबईतील रुईया महाविद्यालयातून सायकॉलॉजीमध्ये मास्टर्स केले आहे. त्यामुळे अभिनयाव्यतिरिक्त ती काउंसिलिंगचे कामही मोठया जबाबदारीने करते.11 / 11‘स्वामिनी’ ही उमाची पहिलीच मालिका होती. या मालिकेत तिने पार्वतीबाई ही भूमिका साकारली होती.