Join us
Daily Top 2Weekly Top 5

महाभारतात गांधारीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने आजवर केले नाही लग्न, आता दिसते अशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 15:20 IST

1 / 8
लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांना महाभारत ही प्रेक्षकांची आवडती मालिका पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.
2 / 8
महाभारतातील गांधारीचे पात्र प्रेक्षकांना चांगलेच भावले होते. हे पात्र अभिनेत्री रेणुका इसरानी यांनी साकारले होते.
3 / 8
गांधारीची भूमिका साकारण्याआधी रेणुकांनी ‘हम लोग’ या मालिकेत काम केले होते. पण त्यांना खरी ओळख दिली ती गांधारी या भूमिकेने. खरे तर महाभारतात त्या पूर्णवेळ डोळ्यांवर पट्टी बांधून दिसल्या. पण तरीही या भूमिकेने त्यांना नवी ओळख दिली.
4 / 8
महाभारत या मालिकेत काम करत असताना रेणुका केवळ 22 वर्षांच्या होत्या.
5 / 8
रेणुका राजस्थानच्या जयपूर येथील महाराणी कॉलेजात शिकल्या. त्या गोल्ड मेडलिस्ट असून दिल्लीत रंगभूमीवर काम करतानाही त्यांनी अनेक पुरस्कार देखील जिंकले आहेत.
6 / 8
महाभारताआधी मणिपुरी भाषेतील ‘अंधाधुन’ नामक नाटक त्यांनी केले होते. या नाटकातही त्यांनी गांधारीची भूमिका साकारली होती. डोळ्यांवर पट्टी बांधलेली असताना चेह-यावरचे हाव-भाव दर्शवणे तसे कठीण काम. मात्र रेणुका यांनी अगदी नैसर्गिक अभिनयाचे दर्शन घडवत, ही भूमिका एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली.
7 / 8
‘बडे अच्छे लगते है’ या शोमध्येही रेणुका यांनी काम केले. या शोच्या शूटींगदरम्यान साक्षी तंवरसोबत त्यांची खूप चांगली बॉन्डिंग झाली होती.
8 / 8
रेणुका यांनी आजवर लग्न केलेले नाहीये. त्याचे सिंगल आयुष्य त्या एन्जॉय करतात.
टॅग्स :महाभारत