Join us  

PHOTOS: नवरा प्रसिद्ध अभिनेता असूनही संकर्षण कऱ्हाडेची पत्नी राहते अत्यंत साधी; ती देखील आहे कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 9:30 AM

1 / 11
‘माझी तुझी रेशीमगाठ”ही मालिका रसिकांची आवडती मालिका बनली आहे.समीर ही भूमिका अभिनेता संकर्षण कर्‍हाडे (Sankarshan Karhade)ने साकारली आहे.संकर्षणचाही प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. (Photo Instagram)
2 / 11
परभणीचं नाव मनोरंजन विश्वात गाजवणारा अभिनेता म्हणजे संकर्षण. चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रात त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.(Photo Instagram)
3 / 11
महाराष्ट्राचा सुपरस्टार या झी मराठीच्या कार्यक्रमात 2008 ला तो दिसला होता. ‘माझीया प्रियाला’ आणि ‘आभास हा’ या मालिकांमध्ये संकर्षणने काम केले आहे. (Photo Instagram)
4 / 11
झी मराठीवरील ‘रामराम महाराष्ट्र’चे सूत्रसंचालनही त्याने केलं. यासोबतच लोभ असावा, मी रेवती देशपांडे या लता नार्वेकर यांच्या व्यावसायिक नाटकात संकर्षण होता. संकर्षण त्याच्या उत्तम अभिनयासोबतच सर्वात जास्त चर्चेत असतो ते त्याच्या जबरदस्त कवितांमुळे.(Photo Instagram)
5 / 11
माझी तुझी रेशमीगाठ मालिकेतील यश आणि त्याचा मित्र समीर यांची मैत्री सर्वांना खूप आवडते. समीरची भूमिका संकर्षण कऱ्हाडेने साकारली आहे. (Photo Instagram)
6 / 11
मा्लिकेत शैफालीच्या प्रेमात असलेल्या संकर्षणच्या खऱ्या आयुष्यातील शैफालीला पाहिलंत का?, संकर्षणाच्या पत्नीचं नाव शलाका आहे. (Photo Instagram)
7 / 11
अभिनेत्रींनाही टक्कर देईल इतकी ती सुंदर दिसते, पण ती लाइमलाईट पासून दूर असते. (Photo Instagram)
8 / 11
आपल्या पत्नीसोबतचे अनेक फोटो तो सोशल मीडियावर शेअर करत असतो.या दोघांमध्ये फारच सुंदर बॉडिंग आहे.(Photo Instagram)
9 / 11
गेल्यावर्षी संकर्षण आणि शलाका आई-बाबा झाले आहेत.या कपलला मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचे नाव सर्वज्ञ आणि मुलीचे नाव स्रग्वी असे ठेवले आहे.(Photo Instagram)
10 / 11
संकर्षणची पत्नी शलाका पांडे ही देखील एक कलाकार आहे. (Photo Instagram)
11 / 11
शलाका पेंटर असून आपले अनेक पेंटिंग ती सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे तिचे कौतुक देखील अनेक जण करताना दिसत असतात.(Photo Instagram)
टॅग्स :झी मराठीटिव्ही कलाकारसेलिब्रिटी