1 / 7बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा ही सर्वांची लाडकी अभिनेत्री. दियाने अलीकडेच तिच्या गरोदरपणाच्या काळातील अत्यंत धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. 2 / 7२०२१ मध्ये वयाच्या ३९ व्या वर्षी दियाने प्रेग्नंसीच्या पाचव्या महिन्यात अॅपेंडिक्सची शस्त्रक्रिया केली होती. या सर्जरीमुळे दियाने बॅक्टेरियल इन्फेक्शनचा सामना केला.3 / 7 यामुळे दियाच्या संपूर्ण शरीरात इंफेक्शन झालं होतं. या गंभीर परिस्थितीत, डॉक्टरांनी सांगितले की, जर दियाची तात्काळ सिझेरियनद्वारे डीलिव्हरी केली गेली नाही, तर दोघांचेही प्राण धोक्यात येऊ शकतात. 4 / 7पुढे दियाची प्री-मॅच्युर डीलिव्हरी करण्यात आली. दियाच्या मुलाचं नाव अव्यान आझाद रेखी. अव्यान जेव्हा जन्माला आला तेव्हा फक्त ८१० ग्रॅम वजनाचा होता.5 / 7त्यामुळे अव्यानला तातडीने अतिदक्षता विभागात (NICU) हलवण्यात आले. जन्मानंतर केवळ ३६ तासांत, त्याच्या आतड्यांमध्ये छिद्र आढळल्यामुळे त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. 6 / 7कोविड-१९ च्या काळात दियाला तिच्या मुलाला आठवड्यातून फक्त दोन वेळा भेटण्याची परवानगी होती. मुलगा अडीच किलो वजनाचा होईपर्यंत त्याला उचलता आले नाही. 7 / 7जेव्हा अव्यानला घरी आणले तेव्हा दिया स्वतःच त्याची ड्रेसिंग करुन काळजी घ्यायची. अव्यान साडेतीन किलो वजनाचा झाल्यावर, त्याची दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. अशाप्रकारे दियाने तिच्या प्रेग्नंसीचा कठीण काळ सर्वांसोबत शेअर केला.