1 / 8कधीकाळी क्रिकेटपटू एमएस धोनीसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री राय लक्ष्मी हिचा आज वाढदिवस.2 / 85 मे 1989 रोजी जन्मलेल्या राय लक्ष्मीने 2005 साली करका कसादरा या सिनेमातून डेब्यू केला होता. पुढे बॉलिवूडच्या ज्युली 2 या सिनेमातही ती दिसली.3 / 8आपल्या सिनेमांपेक्षा राय लक्ष्मी तिच्या पर्सनल लाईफमुळेच अधिक चर्चेत राहिली.4 / 82008 साली आयपीएलदरम्यान तिच्या व धोनीच्या अफेअरची जोरदार चर्चा झाली होती. असे म्हणतात की, राय लक्ष्मी धोनीच्या प्रेमात वेडी होती. पण पुढे दोघांचे मार्ग वेगळे झालेत.5 / 82016 साली एका मुलाखतीत राय लक्ष्मी या अफेअरच्या चर्चेवर बोलली होती. आता बराच काळ गेला आहे. पण आजही धोनीच्या नावासोबत माझ्या नावाचा उल्लेख होतो. धोनीनंतर मी तीन-चार रिलेशनशिपमध्ये होते.पण त्यावर कोणीही बोलत नाही. धोनीसोबतचे माझे नाते जणू एक डाग आहे, जो कधीच जाणारा नाही, असे ती म्हणाली होती.6 / 8मी धोनीला चांगले ओळखत होते. पण त्या नात्याला नाव द्यायला हवे होते की नाही, मला माहित नाही. आम्ही आजही एकमेकांचा आदर करतो. आता आम्ही बरेच पुढे निघून गेलो आहोत. आता आमची कहाणी संपलीये, असेही ती म्हणाली होती.7 / 8राय लक्ष्मी सोनाक्षी सिन्हाच्या अकीरा या सिनेमातही दिसली होती. यात तिने मायाची भूमिका साकारली होती.8 / 8राय लक्ष्मी बॉलिवूडमध्ये फार काळ टिकू शकली नाही. पण साऊथमध्ये आजही तिचा बोलबाला आहे. आत्तापर्यंत तिने साऊथच्या 50 पेक्षा अधिक सिनेमात काम केले आहे.