"मी ती रात्र कधीच विसरणार नाही...", 'दीया और बाती हम' फेम अभिनेत्रीने केला संघर्षाचा सामना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 13:44 IST
1 / 7टीव्ही अभिनेत्री दीपिका सिंह (Deepika Singh) 'दिया और बाती हम' मालिकेमुळे लोकप्रिय झाली. या मालिकेत तिने संध्या राठी ही भूमिका साकारली. तिला मोठा चाहतावर्ग मिळाला. आज अभिनेत्री 35 वा वाढदिवस साजरा करत आहे.2 / 7दीपिकाला इथपर्यंत पोहोचण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. लहानपणापासूनच तिच्या वाट्याला संघर्ष होता. सुरुवातीला तिने गरिबीतच दिवस काढले. एकदा तर तिला मैत्रिणीच्या घरुन मध्यरात्री बाहेर हाकलण्यात आलं होतं. 3 / 7'पिंकव्हिला'ला दिलेल्या मुलाखतीत दीपिका म्हणाली होती की, 'लहानपणी गरिबीमुळे मला अनेक वाईट अनुभव आले. मी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आले. एका वर्षी वडिलांना व्यवसायात मोठं नुकसान झालं. यामुळे आमची आर्थिक परिस्थिती बिकट झाली.4 / 7आईवडिलांकडे माझ्या शाळेची फी देण्याचेही पैसे नव्हते. यामुळे आमचा अनेकदा अपमानही झाला आहे. पैसे भरण्याची क्षमता नाही तर शिकता कशाला? असं मुख्याध्यापक म्हणाले होते. यानंतर मला सरकारी शाळेत दाखल केलं गेलं.5 / 7या आर्थिक परिस्थितीतही मी अभिनेत्री होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. म्हणून आईवडिलांच्या विरोधात जात मी मुंबईला आले. मी माझ्या एका मैत्रिणीच्या घरी राहत होते. एक दिवस तिने मला अचानक मध्यरात्री घराबाहेर काढलं. मी आजपर्यंत ती रात्र विसरलेली नाही.6 / 7अखेर दीपिकाला तिच्या संघर्षाचं फळ मिळालं. 'दीया और बाती हम' मालिकेत तिला मुख्य भूमिका मिळाली. 2016 पर्यंत मालिका चालली. ५ वर्ष तिने मालिकेत काम केलं. याच मालिकेचे दिग्दर्शक रोहित राज गोयलसोबत तिचं अफेअर होतं.7 / 72014 मध्ये तिने रोहितसोबत लग्न केलं. 2017 साली दीपिकाने मुलाला जन्म दिला. सध्या ती कलर्सवरील 'मंगल लक्ष्मी' मालिकेत काम करत आहे.