Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीपिकाचा हटके लूक, तर आलियाच्या ग्लॅमरस अदा, सब्यसाचीच्या इव्हेंटमध्ये बॉलिवूड बालांचा स्टनिंग अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 16:25 IST

1 / 8
अदिती राव हैदरी काळ्या अनारकली सूटमध्ये सुंदर दिसत होती. ड्रेसवरील गोल्डन वर्क खूप छान दिसत होते.
2 / 8
अनन्या पांडे खूपच क्यूट दिसत होती. ब्लॅक नेट ड्रेसमध्ये अनन्याचा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
3 / 8
नेहमीप्रमाणे सोनम कपूर खूपच स्टायलिश दिसत होती. तिने काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेससह हेवी फर जॅकेट घातले होते. सोनम कपूरने तिच्या गळ्यात सिल्व्हर नेकलेस घातला होता. तिच्या वेस्टर्न ड्रेसला भारतीय टच दिला होता.
4 / 8
आलिया भट काळ्या रंगाची साडी नेसून आली होती. साडीत ती खूपच सुंदर दिसत होती.
5 / 8
शर्वरी वाघही स्टायलिश अवतारात दिसली. तिने काळ्या आणि सोनेरी रंगाचा ड्रेस घातला होता.
6 / 8
दीपिका पादुकोण हटके अंदाजात पाहायला मिळाली. व्हाईट पँट आणि व्हाईट लाँग जॅकेट परिधान करून ती स्टायलिश अवतारात रॅम्पवर आली होती. त्याच्या स्वॅगने सर्वांना चकित केले.
7 / 8
दीपिका पदुकोणला पाहून चाहते तिचे वर्णन रेखा असे करत आहेत.
8 / 8
काळ्या रंगाच्या साडीवर गोल्डन वर्क असलेल्या साडीत बिपाशा खूपच सुंदर दिसत होती. बिपाशाने आपल्या स्टाईलने सर्वांना वेड लावले.
टॅग्स :दीपिका पादुकोणआलिया भटसोनम कपूरबिपाशा बासूअनन्या पांडेआदिती राव हैदरी