अमिताभ बच्चन यांच्या बालपणीची भूमिका साकारून लोकप्रिय झालेले हे ६ चाइल्ड आर्टिस्ट आता कुठे आहेत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 12:06 IST
1 / 770's And 80's Child Artists: बॉलिवूडचे महानायक अमिताब बच्चन (Amitabh Bachchan) हे त्यांच्या शानदार अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांनी इतक्या भूमिका गाजवल्या की, त्यांना महानायक म्हटलं जातं. ७९ वर्षीय अमिताभ आजही न थांबता इंडस्ट्रीत काम करत आहेत. आपल्या ५३ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये आतापर्यंत १७५ पेक्षा जास्त सिनेमात काम केलं आहे. गेल्या ५ दशकांमध्ये त्यांनी बॉलिवूडच्या सर्वच कलाकारांसोबत काम केलं आहे. त्यासोबतच असेही काही कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या सिनेमात अमिताभ यांच्या बालपणीची भूमिका साकारली आहे. आज आम्ही तुम्हाला ७० आणि ८०च्या दशकातील त्या बालकलाकारांबाबत सांगणार आहोत ज्यांनी अमिताभ बच्चन यांच्या बालपणीच्या भूमिका साकारल्या होत्या. 2 / 7१) मास्टर मयूर - या लिस्टमध्ये पहिलं नाव मास्टर मयूरचं येतं. त्याचं पूर्ण नाव मयूर राज वर्मा आहे. आजही अमिताभ यांचा बालपणीचा चेहरा म्हटलं तर मयूरचा चेहरा डोळ्यांसमोर येतो. मयूरनने १९७८ मध्ये पहिल्यांदा 'मुकद्दर का सिकंदर' सिनेमात अमिताभ बच्चनची बालपणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर तो अमिताभ यांच्या अनेक सिनेमात दिसला. आज मयूर राज वर्मा अमेरिकेत आपला रेस्टॉरन्ट बिझनेस चालवत आहे.3 / 7२) मास्टर रवि - मास्टर रविचं खरं नाव रवि वलेचा आहे. रविने १९७६ मध्ये 'फकीरा' सिनेमातून डेब्यू केलं होतं. पण त्याला खरी ओळख १९७७ मधील 'अमर अकबर एंथनी' सिनेमातून मिळाली होती. यात मास्टर रविने अमिताभ बच्चनच्या बालपणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर रविने 'देश प्रेमी', 'शक्ति' आणि 'कुली' सारख्या सिनेमात अमिताभ यांच्या बालपणीची भूमिका साकरली होती. रवि आज हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. भारतात तो टॉप प्रायव्हेट सेक्टर बॅंकांना हॉस्पिटॅलिटी सेवा देतो.4 / 7३) मास्टर अलंकार जोशी - अमिताभ बच्चन यांच्या 'दीवार' सिनेमातील छोटा विजय सर्वांनाच लक्षात असेल. ही भूमिका साकारणारा चाइल्ड आर्टिस्टचं नाव मास्टर अलंकार जोशी होतं. ही भूमिका साकारल्यानंतर अलंकारी इंडस्ट्रीतील फेमस चाइल्ड आर्टिस्ट बनला होता. पुढे तो शिक्षणासाठी अमेरिकेत गेला. आज अलंकार जोशी आयटी बिझनेसमन आहे. अनेक देशात त्याचा बिझनेस पसरला आहे.5 / 7४) मास्टर मंजूनाथ - मास्टर मंजूनाथला ८०च्या दशकातील प्रसिद्ध मालिका 'मालगुडी डेज'पासून मोठी ओळख मिळाली. मंजूनाथ त्या काळातील सर्वात महागडा चाइल्ड आर्टिस्ट बनला होता. त्याने अमिताभ बच्चन यांच्या 'अग्निपथ' सिनेमा अमिताभ यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. मंजूनाथ आता बंगळुरूमध्ये पीआर कंपनी चालवतो.6 / 7५) मास्टर राजू - मास्टर राजूही ७० आणि ८० च्या दशकात इंडस्ट्रीतील फेमस चाइल्ड आर्टिस्ट होता. मास्टर राजूचं पूर्ण नाव राजू श्रेष्ठा आहे. राजूने त्या काळात जवळपास सर्वच कलाकारांसोबत काम केलं हों. पण त्याला खरी ओळख त्रिशूल आणि नास्तिक सिनेमातून मिळाली. या दोन्ही सिनेमा मास्टर राजू अमिताभच्या बालपणीच्या भूमिकेत दिसला होता. राजू श्रेष्ठा आजही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे.7 / 7६) मास्टर टीटो - या लिस्टमध्ये अखेरचं नाव मास्टर टीटोचं येतं. मास्टर टीटोचं पूर्ण नाव टीटो खत्री आहे. टीटोने अनेक सिनेमात चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम केलं. पण त्याला खरी ओळख १९७७ मध्ये रिलीज झालेल्या परवरिश सिनेमात यंग अमिताभच्या भूमिकेतून मिळाली. यानंतर टीटोने १९८१ मध्ये रिलीज झालेल्या नसीब आणि याराना सिनेमात अमिताभच्या बालपणीची भूमिका साकारली होती. मास्टर टीटो आजही अभिनेता आणि क्रिएटीव्ह डायरेक्टर म्हणून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे.