By देवेंद्र जाधव | Updated: February 20, 2025 18:17 IST
1 / 7सध्या 'छावा' सिनेमा चांगलाच गाजतोय. या सिनेमात स्वराज्याचे सरलष्कर सरसेनापती हंबीरराव यांची भूमिका आशुतोष राणांनी साकारली आहे2 / 7आशुतोष राणांनी सिनेमात साकारलेली सरसेनापती हंबीररावांची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडतेय. आशुतोष राणांनी आजवरच्या कारकीर्दीत केवळ एका मराठी सिनेमात काम केलं. 3 / 7'येडा' असं या मराठी सिनेमाचं नाव आहे. आशुतोष राणांनी सिनेमात अप्पा कुलकर्णींची भूमिका साकारली. 4 / 7आशुतोष राणांचा हा सिनेमा एक थ्रिलर आणि हॉरर आहे. आशुतोष राणांनी साकारलेलं अप्पा कुलकर्णी हे कॅरेक्टर अंधश्रद्धेच्या आहारी गेलं असतं. 5 / 7पैशांच्या लोभापोटी अप्पा बायको आणि पोटच्या मुलाला मानसिक त्रास देतो. इतकंच नव्हे तो मुलाचा जीवही घेतो. अप्पा असं का करत असतो? याची उत्तरं सिनेमा पाहूनच तुम्हाला कळतील6 / 7'येडा' सिनेमात आशुतोष राणांनी साकारलेलं अप्पा कुलकर्णी कॅरेक्टर चांगलंच गाजलं. आशुतोष राणांनी आजवरच्या कारकीर्दीत या एकमेव मराठी सिनेमात काम केलं.7 / 7'येडा' सिनेमात आशुतोष राणांसोबत सतीश पुळेकर, रीमा लागू, अनिकेत विश्वासराव, किशोरी शहाणे यांनी भूमिका साकारली होती. झी ५ या ओटीटीवर तुम्ही हा सिनेमा पाहू शकता.