Join us  

PHOTOS: 'चला हवा येऊ द्या' फेम भारत गणेशपुरेने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, जाणून घ्या त्याच्या पत्नीविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 1:57 PM

1 / 9
झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) शो २०१४ सालीपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.(Photo Instagram)
2 / 9
या शोमधील कलाकारांनी आपल्या विनोदी कौशल्याने प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडले आहे. (Photo Instagram)
3 / 9
या शोमधून अभिनेता भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure) लोकप्रिय झाले. भारत गणेशपुरे पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.(Photo Instagram)
4 / 9
होय भारत गणेशपुरे आपल्याच पत्नीसोबत पुन्हा लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. त्याच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. (Photo Instagram)
5 / 9
भारत गणेशपुरे यांनी काही वर्षांपूर्वी अर्चना यांच्यासोबत दुसऱ्यांदा लगीनगाठ बांधली होती. त्यांनी पत्नीसोबत पुन्हा लग्न करण्यामागेदेखील एक विशेष कारण आहे. (Photo Instagram)
6 / 9
झी मराठीवरील बँड बाजा वरात या कार्यक्रमात प्रेक्षकांना कलाकारांच्या लग्नाची गंमत पहायला मिळणार. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. (Photo Instagram)
7 / 9
या कार्यक्रमातून प्रेक्षकांना प्रत्येक आठवड्यात सेलिब्रिटीजच्या लग्नाचा थाट, त्यांचा आता पर्यंतचा प्रवास त्यातील गमती-जमती पाहायला मिळणार आहेत त्याचप्रमाणे सेलिब्रिटीजना देखील त्यांच्या लग्नातील काही खास क्षण पुन्हा एकदा जगायला मिळतील.(Photo Instagram)
8 / 9
या आठवड्यात प्रेक्षकांना अभिनेता भारत गणेशपुरे व त्यांच्या सौ आणि अभिनेत्री किशोरी शहाणे वीज आणि त्यांचे पती दीपक बलराज वीज यांच्या लग्नाची धूम पाहायला मिळेल. (Photo Instagram)
9 / 9
भारत गणेशपुरे यांच्या पत्नीचे नाव अर्चना गणेशपुरे आहे. त्या देखील दिसायला खूप सुंदर आहेत. भारत गणेशपुरे आपल्या पत्नीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. (Photo Instagram)
टॅग्स :भारत गणेशपुरेझी मराठी