Join us
Daily Top 2Weekly Top 5

Border 2: 'बॉर्डर २'साठी सनी पाजीने घेतले बक्कळ पैसे, तर सुनील शेट्टीचा लेक अहानला मिळालं सगळ्यात कमी मानधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 14:45 IST

1 / 9
Border 2: १९९९ साली प्रदर्शित झालेल्या 'बॉर्डर' या सिनेमाच्या सीक्वलची सगळ्यांना उत्सुकता होती. अखेर २३ जानेवारीला 'बॉर्डर २' सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला आहे.
2 / 9
'बॉर्डर २'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून अॅडव्हान्स बुकिंगमध्येच सिनेमाची लाखो तिकिटे विकली गेली होती.
3 / 9
पहिल्याच दिवशी 'बॉर्डर २'चे शो ठिकठिकाणी हाऊसफूल झाल्याचं दिसत आहे. या सिनेमात सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, मोना सिंह अशी स्टारकास्ट आहे.
4 / 9
'बॉर्डर २'साठी सनी देओलने सगळ्यात जास्त मानधन घेतलं आहे. या सिनेमासाठी त्याने ५० कोटी रुपये फी घेतल्याची चर्चा आहे.
5 / 9
वरुण धवनने या सिनेमात मेजर होशियार सिंह दहिया ही भूमिका साकारली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्याला ८-१० कोटी मानधन मिळालं आहे.
6 / 9
तर 'बॉर्डर २'मध्ये फ्लाइट कमांडरची भूमिका साकारणाऱ्या दिलजीत दोसांझने सिनेमासाठी ४-५ कोटी फी घेतली आहे.
7 / 9
'बॉर्डर २'मध्ये अहान शेट्टीदेखील मुख्य भूमिकेत आहे. पण, या सिनेमासाठी त्याने किती मानधन घेतलं हे अद्याप समोर आलेलं नाही.
8 / 9
मीडिया रिपोर्टनुसार, 'बॉर्डर २'साठी अहानला सगळ्यात कमी माधन मिळालं आहे.
9 / 9
तर मोना सिंह, सोनम बाजवा, मेधा राणा या अभिनेत्रींच्या मानधनाचाही आकडाही गुलदस्त्यात आहे.
टॅग्स :सीमारेषासनी देओलअहान शेट्टीवरूण धवनदिलजीत दोसांझ