Join us
Daily Top 2Weekly Top 5

Year End 2025: एकापेक्षा एक 'धुरंधर' खलनायकांनी गाजवलं बॉक्स ऑफिस, अक्षय खन्नाच नाही तर 'या' कलाकारांचीही चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 12:35 IST

1 / 7
२०२५ या वर्षाला निरोप देण्यासाठी काहीच दिवस राहिले आहेत. या वर्षात मनोरंजनविश्वामध्ये अनेक नायक खलनायक म्हणून प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या खलनायकी अवतारामुळे चित्रपट चांगलेच गाजले.
2 / 7
अक्षय खन्ना, ज्युनिअर एनटीआर ते रितेश देशमुख अशा अनेक कलाकारांनी यावेळी आपल्या व्हिलेन रोलमधून सर्वांना चकित केलं.
3 / 7
१० एप्रिल रोजी आलेला सनी देओलचा 'जाट'. या सिनेमात रणदीप हुड्डाने राणातुंगा नावाच्या खतरनाक खलनायकाची भूमिका साकारली. सनी देओलपेक्षा रणदीपचीच जास्त चर्चा झाली.
4 / 7
मे महिन्यात आलेला 'रेड २'. यामध्ये आयकर अधिकारी अजय देवगणसमोर यावेळी रितेश देशमुख व्हिलनच्या भूमिकेत होता. नेत्याच्या भूमिकेत दिसलेल्या रितेशची स्टाईल प्रेक्षकांना आवडली.
5 / 7
तसंच यावर्षी आलेल्या 'वॉर २'मध्ये ज्युनिअर एनटीआरने खलनायक बनून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याने हृतिक रोशनला टक्कर देणारे अॅक्शन सीन्स आणि डान्सही केला.
6 / 7
'स्त्री' सिनेमापासून एकापेक्षा एक हिट देणाऱ्या मॅडॉक फिल्म्सचा 'थामा' सिनेमा यावर्षी आला. आयुष्मान खुराना-रश्मिकाच्या या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी खलनायकी भूमिकेत भाव खाऊन गेला.
7 / 7
तर आता सध्याचा खलनायक म्हटलं तर अक्षय खन्नाचं नाव येतंच. आधी 'छावा'मधील औरंगजेब आणि आता 'धुरंधर'मधला रहमान डकैत भूमिकेतून त्याने प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणलं.
टॅग्स :अक्षय खन्नाबॉलिवूडनवाझुद्दीन सिद्दीकीरणदीप हुडा