Join us  

Yami Gautam: बॉलिवूड पार्ट्यांना जाऊन काम मागण्यापेक्षा मी..., यामी गौतमचं ठरलं...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 6:05 PM

1 / 9
यामी गौतम बॉलिवूडची मोठी अभिनेत्री आहे. पण याऊपर ती लो-प्रोफाइल राहणं पसंत करणे. कदाचित म्हणूनच बॉलिवूडच्या झगमगाटात कधीकधी तिला परकं वाटतं.
2 / 9
एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत यामी गौतमने खुद्द यामागचं कारण सांगितलं. मुंबई हे शहर तुमची पदोपदी परिक्षा घेतं, तुम्हाला आतून तोडतं, असं ती म्हणाली.
3 / 9
मी कधीही हार मानली नाही. पण एकाक्षणी मी सुद्धा बॉलिवूड सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला होता. २०१८ २०१९ मध्ये मी अभिनय सोडण्याच्या निर्णयापर्यंत आले होतं, असं ती म्हणाली.
4 / 9
ती म्हणाली, विकी डोनरनंतर माझे सिनेमे फ्लॉप जात होते. मी निराश झाले होते. सगळे माझ्याकडे हिमाचल प्रदेशात काही जमीन पडून होती आणि जर माझा पुढचा सिनेमा चालला नाही तर मी शेती करेल, असं मी ठरवलं होतं.
5 / 9
ती म्हणाली, मी माझ्या आईला सांगितले होते की, माझा चित्रपट चालला नाही तर मी हिमाचलला परत येईन. मला अभिनय आवडतो. पण इथे प्रत्येक क्षण तुमची परिक्षा घेतो. आईनेही होकार दिला होता.
6 / 9
पुढे ती म्हणाली, बॉलिवूडची संस्कृती, इथल्या श्रद्धा, इथली माणसं या सगळ्याचा तुमच्यावर परिणाम होतो. मला स्वतःला मार्केटिंग करायला आवडत नाही. मी जर चांगली अभिनेत्री आहे तर मग मला त्याची बढाई मारायची काय गरज आहे?
7 / 9
ती म्हणाली, नेटवर्किंग आणि सोशलायझेशनवर दे असं मला नेहमीच सांगण्यात येतं. पण माझ्यासारख्या लोकांना ते आवडत नाही. मला काम मागण्यासाठी पार्टीत नेटवर्किंग करण्याची गरज का आहे? जे हे करतात, ते चुकीचं करतात, असं मी म्हणत नाही.
8 / 9
4 जून 2021 रोजी यामीनं हिमाचल प्रदेशात अंत्यंत साध्या पद्धतीनं आणि गुपचूप लग्न करत, सर्वांना सुखद धक्का दिला होता. यामीने दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्नगाठ बांधली.
9 / 9
यामी व आदित्यची पहिली भेट ‘उरी’च्या सेटवर झाली होती. याच सेटवर आधी मैत्री झाली आणि मग दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पण या प्रेमाची चर्चा कुठेही नव्हती. कारण यामी व आदित्यने याचा थांगपत्ताही कुणाला लागू दिला नव्हता.
टॅग्स :यामी गौतमबॉलिवूड