Join us

17 वर्ष झालीत, पण आजपर्यंत शाहरूखने आपल्या या सिनेमाचा शेवट पाहिला नाही, वाचा कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 17:07 IST

1 / 9
शाहरूख खानला बॉलिवूडचा किंगखान म्हणतात ते उगाच नव्हे. इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये शाहरूखने अनेक हिट सिनेमे दिलेत. पण त्याचाच एक सिनेमा आज 17 वर्षानंतरही त्याने पूर्ण पाहिलेला नाही.
2 / 9
होय, या चित्रपटाचा शेवट अजूनही शाहरूखने पाहिलेला नाही. या चित्रपटाचं नाव आहे स्वदेश.
3 / 9
शाहरूख व गायत्री जोशी यांच्या अभिनयाने सजलेला आणि आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा रिलीज होऊन नुकतीच 17 वर्षे झालीत.
4 / 9
17 वर्षांपूर्वी आशुतोष या सिनेमाची कल्पना घेऊन शाहरूखला भेटला, तेव्हा स्टोरी ऐकून शाहरूख काहीसा नाखूश होता. स्टोरी चांगली आहे पण सिनेमा चालणार नाही, असं तो आशुतोषला म्हणाला होता.
5 / 9
झालंही तेच. सिनेमा फार चालला नाही. पण नंतर हाच सिनेमा मास्टरपीस म्हणून ओळखला जाऊ लागला. अगदी ‘स्वदेश’ शाहरूखच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांपैकी एक यादगार सिनेमा ठरला.
6 / 9
‘स्वदेश’ करता करता या चित्रपटात शाहरूख प्रचंड गुंतत गेला. हा सिनेमा शाहरूखने अनेकदा पाहिला. पण याचा शेवट त्याने आजपर्यंत पाहिलेला नाही.
7 / 9
शाहरूखने एका मुलाखतीत याचं कारण सांगितलं होतं. या सिनेमाचा शेवट इतका इमोशनल होता की, आजपर्यंत तो पाहण्याचा धीर मला झाला नाही. त्यामुळे मी कधीच शेवट पाहू शकलो नाही, असं तो म्हणाला होता.
8 / 9
‘स्वदेश’ या चित्रपटात शाहरूखने मोहन भार्गव नावाच्या एका शास्त्रज्ञाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील काही सीन्स नासा रिसर्च सेंटरमध्ये शूट केले गेले आहेत.
9 / 9
नासाचा एक शास्त्रज्ञ मायदेशी परतल्यानंतरही कथा या चित्रपटात दाखवली गेली आहे. हा सिनेमा पाहून तेव्हा अनेक विदेशी भारतीय मायदेशी परतले होते, असे म्हणतात.
टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूड