Shamita Shetty Birthday: शिल्पा शेट्टीची बहिण शमितानं अजूनही का केलं नाही लग्न? हे आहे खरं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 11:11 IST
1 / 8शिल्पा शेट्टीनं अपार यश मिळवलं. पण तिच्या तुलनेत तिची बहीण शमिता शेट्टी काहीशी अपयशी ठरली. 2000 मध्ये ‘मोहब्बते’ चित्रपटातून शमिताने बॉलिवूड डेब्यू केला.‘मोहब्बते’ हिट झाला पण शमिताची झोळी मात्र खाली राहिली. 2 / 8पुढे शमिता काही चित्रपटात दिसली. पण आली तशी गायब झाली. आज हे सांगण्याचं कारण म्हणजे, आज शमिताचा वाढदिवस. होय, शमिता शेट्टी आज आपला वाढदिवस साजरा करत आहे.3 / 8फॅशन डिझाईनिंगमध्ये डिप्लोमा केल्यानंतर शमिताने फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्रासोबत काम केलं. मनीष मल्होत्रा यानेच शमिताला अॅक्टिंगमध्ये नशीब आजमावण्याचा सल्ला दिला आणि 2000 मध्ये ‘मोहब्बते’ सिनेमातून शमिता अॅक्टिंगच्या दुनियेत आली.4 / 8यानंतर फरेब, जहर, कॅश अशा अनेक सिनेमात ती झळकली. पण बहिणीसारखं स्टारडम तिला मिळवता आलं नाही. चित्रपटांत डाळ शिजत नाही म्हटल्यावर शमिताने छोट्या पडद्याकडे मोर्चा वळवला. बिग बॉससारख्या रिॲलिटी शोमध्ये ती झळकली.5 / 8शमिताने चाळीशी ओलांडलीये. पण अद्यापही ती अविवाहित आहे. तिने लग्न का केलं नाही, हा प्रश्न अनेकांना पडताे. तर त्यामागे एक कारण आहे. हे कारण ऐकून तुम्हीही भावुक व्हाल.6 / 8बिग बॉस ओटीटीमध्ये खुद्द शमिताने याचा खुलासा केला होता. शमिता 18 वर्षांची असताना तिच्या पहिल्या बॉयफ्रेन्डचा एका कार अपघातात मृत्यू झाला. शमिताने त्याला कायमचं गमावलं. हे दु:ख आजपर्यंत ती विसरू शकली नाहीये.7 / 8 याच कारणामुळे तिने इतकी वर्ष कुणालाच आपल्या आयुष्यात येऊ दिलं नाही. अनेक वर्षानंतर ‘बिग बॉस ओटीटी’दरम्यान ती अभिनेता राकेश बापटच्या जवळ आली. पण काही महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर त्याच्यासोबतही तिचं ब्रेकअप झालं. 8 / 8भलेही चित्रपटांत शमिता शेट्टी अपयशी ठरली. पण ती कोट्यावधीची मालकीन आहे. रिपोर्टनुसार, तिची नेट वर्थ 1 ते 5 मिलियन डॉलर आहे. शमिता एक इंटिरिअर डिझाईनर आहे आणि अनेक ब्रँडच्या जाहिरातीही करते. यातून ती लाखोंची कमाई करते.