Join us  

सलमान खान करतोय समंथाला डेट? 'या' एका फोटोमुळे सोशल मीडियावर होतीये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 1:57 PM

1 / 10
बॉलिवूड अभिनेता सलमान खान (salman khan) त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळेदेखील कायम चर्चेत असतो. यात खासकरुन त्याच्या अफेअरविषयी चर्चा रंगतांना पाहायला मिळतात.
2 / 10
बॉलिवूडसह अनेक विदेशी मुलींना सलमानने डेट केल्याचं समोर आलं आहे. यामध्येच आता तो अशाच एका अभिनेत्रीमुळे चर्चेत आला आहे.
3 / 10
गेल्या काही दिवसांपासून सलमान अभिनेत्री समंथाला डेट करत असल्याची चर्चा आहे. या दोघांचा एका पार्टीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा फोटो पाहिल्यावर सलमान समंथाला डेट करतोय का? असा प्रश्न अनेकांना पडला होता.
4 / 10
सलमानसोबत ज्या अभिनेत्रीचं नाव जोडलं जातंय ती एक विदेशी मॉडेल आणि अभिनेत्री आहे. समंथा लॉकवूड (samantha lockwood) असं तिचं पूर्ण नाव आहे.
5 / 10
समंथाचा बॉलिवूडमधील वावर वाढला असून ती अनेकदा बॉलिवूड कलाकारांसोबत स्पॉट झाल्याचं पाहायला मिळतं. परंतु, सलमानसोबत तिला पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं.
6 / 10
२८ एप्रिल १९९२ मध्ये समंथाचा जन्म झाला असून ती मूळची अमेरिकेची आहे.
7 / 10
कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमधून समंथाने तिचं शिक्षण पूर्ण केलं असून ती काही हॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकली आहे. त्यानंतर, आता तिने तिचा मोर्चा बॉलिवूडकडे वळवला आहे.
8 / 10
२०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शूट द हीरो' मध्ये ती झळकली होती. तिने 'केट' ही भूमिका साकारली होती. तसंच ती Return of the Outlaws आणि X-treme Fighter मध्येही काम केलं आहे.
9 / 10
समंथा सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
10 / 10
सलमानच्या वाढदिवसाशी देखील समंथाने त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली होती.
टॅग्स :सलमान खानसेलिब्रिटीबॉलिवूड