By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 15:39 IST
1 / 7'धुरंधर २' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. या सिनेमात एका पात्राने चांगलाच भाव खाल्ला. तो म्हणजे रिझवान. 'धुरंधर २' मध्ये हमजा अलीचा राईट हँड असणाऱ्या रिझवानच्या भूमिकेत अभिनेता मुस्तफा अहमद झळकला.2 / 7मुस्तफाच्या आयुष्याचा प्रवास खूप संघर्षमयी आहे. मुस्तफाकडे दर महिना १ लाख रुपये पगार असलेली कॉल सेंटरची नोकरी होती. परंतु अभिनयाची आवड जपण्यासाठी मुस्तफाने या नोकरीवर पाणी सोडलं3 / 7पुढे महिना १० हजार पगारावर मुस्तफाने जिम ट्रेनर म्हणून काम करायला सुरुवात केली. मुस्तफाच्या कुटुंबाला त्याचा हा निर्णय पटला नाही. परंतु मुस्तफाने जिद्द नाही सोडली.4 / 7मुस्तफाचे नशीब तेव्हा चमकले जेव्हा त्याला हृतिक रोशनला ट्रेन करण्याची संधी मिळाली. मुस्तफाचं रणवीर सिंगसोबत नातं असं ते म्हणजे तो रणवीरचाही जिम ट्रेनर राहिला आहे.5 / 7रणवीर सिंगने 'पद्मावत' चित्रपटात 'अलाउद्दीन खिल्जी'च्या भूमिकेसाठी जे ट्रान्सफॉर्मेशन केलं त्यामागे मुस्तफाने दिलेलं प्रशिक्षण महत्वाचं होतं. इतकेच नव्हे तर विकी कौशल (सरदार उधम) आणि यामी गौतम (आर्टिकल ३७०) यांनाही त्याने फिटनेस ट्रेनिंग दिले आहे.6 / 7अशामागे कायम फिटनेस ट्रेनर म्हणून पडद्यामागे असलेल्या मुस्तफाला 'धुरंधर २' मुळे मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली. मुस्तफाने संधीचं खऱ्या अर्थाने सोनं केलं.7 / 7'धुरंधर २' बघितलेल्या प्रत्येकाला मुस्तफाने साकारलेली रिझवानची भूमिका चांगलीच आवडली. अशाप्रकारे स्वतःची आवड जोपासून मुस्तफाने मेहनतीने स्वतःचं आयुष्य बदललं.