Join us  

आर.माधवनच्या Dhoka Round D Cornerमधून डेब्यू करणार खुशाली आहे तरी कोण? जाणून घ्या तिचे बॉलिवूड कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2022 12:23 PM

1 / 9
आर. माधवन सध्या त्याचा सिनेमा 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट' (Rocketry: The Nambi Effect) ला घेऊन चर्चेत आहे. लवकरत त्याचा ‘धोखा - राउंड डी कॉर्नर’ (Dhokha Round D Corner) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo Instagram)
2 / 9
यात त्याच्यासोबत अपारशक्ति खुराना (Aparshakti Khurana), दर्शन कुमार (Darshan Kumar) आणि खुशाली कुमार (Khushali Kumar) झळकणार आहे. (Photo Instagram)
3 / 9
कुकी गुलाटी दिग्दर्शित या चित्रपटातून खुशाली कुमार बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. (Photo Instagram)
4 / 9
सध्या खुशालीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. जाणून घेऊया खुशाली कुमार कोण आहे?, तिचे बॉलिवूड कनेक्शन काय आहे ते.(Photo Instagram)
5 / 9
खुशाली कुमार ही एक भारतीय अभिनेत्री आणि फॅशन डिझायनर आहे. तिचे जन्म 19 डिसेंबर 1988 साली झाला. (Photo Instagram)
6 / 9
खुशाली 2015 मध्ये 'मैनु इश्क दा' या व्हिडीओ साँगमध्ये दिसली होती, यानंतर ती हायवे स्टार, रात कमल है, मेरे पापा, इक याद पुरानी या लोकप्रिय गाण्यांमध्ये दिसली.(Photo Instagram)
7 / 9
आता ती‘धोखा - राउंड डी कॉर्नर’ बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवयला सज्ज झाली आहे. (Photo Instagram)
8 / 9
ती टी-सीरीज ग्रुपचे संस्थापक गुलशन कुमार यांची मुलगी आहे आणि भूषण कुमारची बहीण आहे. (Photo Instagram)
9 / 9
खुशाली होम प्रॉडक्शन असलेल्या टी-सीरीजच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या 'धोखा - राऊंड डी कॉर्नर' या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. हा सिनेमा २०२३ला रिलीज होईल. (Photo Instagram)
टॅग्स :आर.माधवनभुषण कुमारबॉलिवूड