By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 15:49 IST
1 / 8धर्मेन्द्र यांचा नातू आणि सनी देओल यांचा लेक करण देओल १८ जून बोहल्यावर चढणार आहे. करण त्याच्या गर्लफ्रेंडसोबत सातफेरे घेणार आहे. लग्नाचे प्री-वेडिंग फंक्शनदेखील सुरु झाले आहेत.2 / 8देओल घराण्याच्या होणाऱ्या सूनचे नाव द्रिशा आर्चाय आहे, द्रिशा ही कोण आहे, हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 3 / 8द्रिशा व करण दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत होते आणि अखेर ते लग्न बंधनात अडकणार आहेत.4 / 8 द्रिशा ही दिवंगत चित्रपट निर्माते दिग्दर्शक बिमल रॉय यांची पणती आहे. स्ट्रगल काळात बिमल यांनीच धर्मेन्द्र यांना काम दिलं होतं. दोघांची घट्ट मैत्री होती. याच बिमल रॉय यांची पणती आता देओल घराण्याची सून होणार आहे.5 / 8द्रिशाच्या वडिलांचे नाव सुमीत आचार्य तर आईचं नाव चीमू आचार्य आहे. 6 / 8सनी देओल यांच्या होणाऱ्या सूनबाई द्रिशा तिच्या आई-वडिलांसोबत दुबईमध्ये राहत आहे.7 / 8द्रिशा बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर आहे. ती सध्या ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे.8 / 8 करण आणि द्रिशाच्या लग्नाचे आमंत्रणं बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीतील जवळपास सर्वांनाच पाठवण्यात आलं आहे.