Join us

कुठे आहे 'तेरी जवानी बड़ी-बड़ी मस्त है'गाण्यातील हिरोईन? जाणून घ्या काय करते ती आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 11:14 IST

1 / 9
अंजला झावेरीने 90च्या दशकातील सिनेमांमध्ये काम करून बरंच नाव मिळवलं होतं. पण नंतर ती अचानक गायब झाली. मात्र, तिचे फॅन्स आजही आहेत. 'प्यार किया तो डरना क्या' (Pyaar Kiya To Darna Kya) मधील 'तेरी जवानी बड़ी-बड़ी मस्त है' (Teri Jawani Badi Mast Mast Hai) गाण्यातून अंजाला खूप फेमस झाली होती. पण आता ती कुठे आहे आणि काय करते हे जाणून घेऊ.
2 / 9
अंजला झावेरीला (Anjala Zaveri) दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांनी लॉन्च केलं होतं. त्यांनी अक्षय खन्नाच्या 'हिमालय पुत्र' (Himalay Putra) मधून तिला लॉन्च केलं होतं. हा सिनेमा 1997 मध्ये रिलीज झाला होता. त्यावेळी अंजाला 16 वर्षांची होती.
3 / 9
त्यानंतर अंजाला 'प्यार किया तो डरना क्या' मध्ये दिसली होती. तिची भूमिका लोकांना आवडली होती. यात ती अरबाज खानची हिरोईन असते. तिचं गाणंही खूप गाजलं होतं.
4 / 9
'प्यार किया तो डरना क्या' नंतर अंजालाने 'बेताबी' सिनेमा केला होता. यात चंद्रचूड़ सिंह, अरशद वारसी, मयूरी कांगो होती. सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार काही चालला नाही. पण कथा लोकांना आवडली होती.
5 / 9
अंजला डेब्यू सिनेमा केल्यानंतर तमिळ आणि तेलुगु सिनेमे करायला लागली होती. नागार्जुन, नंदामुरी बालाकृष्णा, सुदीप आणि ममूटी सारख्या मोठ्या स्टारसोबत तिने काम केलं.
6 / 9
अंजलाने तसे तर बरेच हिंदी सिनेमे केले, पण तिला जास्त यश मिळू शकलं नाही. हिंदी सिनेमात फार काही झालं नाही तेव्हा ती साऊथ सिनेमाकडे वळली. आता साऊथमध्ये अंजलाचं खूप नाव आहे. ती एक फेमस हिरोईन आहे.
7 / 9
अनेकांना हे माहीत नाही की, अंजला झावेरी इंग्लंडहून आली होती. तिचा जन्म 20 एप्रिल 1972 मध्ये लंडनच्या पोर्ट्समाउथमध्ये एका गुजराती परिवारात झाला होता. अंजलाचे वडील भारतीय होते. त्यांना भारतात राहणं आवडत होतं. त्यामुळेच अंजलाला सुद्धा भारतात यायला मिळालं.
8 / 9
एका मुलाखतीत अंजालाने सांगितलं होतं की, तिला भारतीय सिनेमे खूप आवडत होते. हिंदी सिनेमे बघण्यासाठी ती लंडनमध्ये एका दुकानातून कॅसेट्स विकत घेत होती.
9 / 9
अंजला आता लाइमलाईटपासून दूर आहे. ती तिच्या मॉडल-अभिनेता पती तरूण अरोडासोबत सुखी वैवाहिक जीवन जगत आहे. ती तिच्या आयुष्यात आनंदी आहे. तरूण साऊथच्या सिनेमांमधील एक फेमस व्हिलन आहे. त्याने 'जब वी मेट' मध्ये करिनाच्या बॉयफ्रेंडची भूमिका केली होती.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी