'मैने प्यार किया' सिनेमातील सीमा आज कुठे आहे आणि काय करतेय? आता कशी दिसते ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 12:54 IST
1 / 8'मैने प्यार किया' सिनेमातील भूमिका असो वा डायलॉग आजही लोकांच्या मनात घर करून आहेत. 'लड़का और लड़की कभी दोस्त नहीं हो सकते' और 'दोस्ती में No Sorry No Thank you' हे डायलॉग तर आजही तरूणाईच्या तोंडून ऐकायला मिळतात. या सिनेमाला येऊन आता ३० वर्षे झाली आहेत. पण अनेकजणांचा आजही हा फेवरेट सिनेमा आहे. 2 / 8१९८९ मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमातील सगळी गाणी सुपरहिट झाली होती. सिनेमात सुमनची भूमिका जेवढी पसंत केली गेली तेवढीच लोकप्रिय झाली होती सीमा. तिच सीमा जी प्रेमच्या मागे लागली होती. ही भूमिका परवीन दस्तूरने साकारली होती. ती सिनेमात मोहनीश बहलची बहीण होती3 / 8सीमा या सिनेमात फार शिष्ट, फाडफाड इंग्रजी बोलणारी तरूणी दाखवली होती. वेस्टर्न कपडे, कुरळे केस आणि मेकअप यामुळे सीमा लक्षात होती. सीमाला या सिनेमातून मोठी लोकप्रियता मिळाली. पण त्यानंतर ती फार कशात दिसली नाही. सिनेमात किंवा मालिकांमध्ये दिसली नाही. जर परवीन बॉलिवूडपासून दूर आहे तर मग आता कुठे आहे? काय करते? चला जाणून घेऊ...4 / 8'मैने प्यार किया' हा सिनेमा भाग्यश्री प्रमाणेच परवीन दस्तूरचाही पहिलाच सिनेमा होता. जशी सुमनच्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी साधी, गोड मुलगी हवी होती, तेच सीमाच्या भूमिकेसाठी त्यांना एक भारतीय पण परदेशी लूक असलेली, इंग्रजी बोलणारी तरूणी हवी होती. त्यावेळी परवीन थिएटर करत होती. तिने ऑडिशन दिलं आणि तिला हा रोल मिळाला.5 / 8परवीनने सीमाच्या भूमिकेला पूर्णपणे न्याय दिला आणि ही भूमिका फार छान रंगवली. त्यामुळे सीमा आजही लोकांच्या लक्षात आहे. परवीन रातोरात फेमस झाली. पण तिला सिनेमे मिळाले नाही आणि मग ती जाहिरातीकडे वळली. १९८९ नंतर परवीनचा दुसरा सिनेमा 'दिल के झरोखे में' ८ वर्षांनी १९९७ मध्ये रिलीज झाला. ज्यामुळे फॅन्स प्रेम मिळवण्यात ती अपयशी ठरली. 6 / 8परवीनने अपयश मिळाल्याने निराश न होता बॉलिवूड सोडलं. परवीनने शाहरूख सायरस ईराणीसोबत लग्न केलं. त्यांना आता दोन मुली आहेत. परवीनचा पतीही एक थिएटर आर्टिस्ट आहे. त्यामुळे परवीनने सुद्धा तिचं पहिलं प्रेम थिएटर सोडलं नाही. ती आजही थिएटर करते. त्यासोबतच ती एक सक्सेसफुल हेअर स्टायलिश आहे आणि अनेक बॉलिवूड स्टार्सना तिने सर्व्हिस दिली आहे.7 / 8परवीनला कधीही बॉलिवूडमध्ये अपयश मिळाल्याचं दु:खं वाटलं नाही. कारण प्रत्येक व्यक्तीकडे दोन मार्ग असतात. फक्त ते निवडायचे असतात. परवीनने थिएटर आणि हेअर स्टायलिंगची निवड केली. त्यामुळे आज ती पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफ दोन्हींमध्ये खूश आहे. तिने योग्य बॅलन्स बनवून ठेवला आहे. 8 / 8