Join us

कुठे गायब झाली राम गोपाल वर्माची फेवरेट हिरोईन अंतरा माळी? आपल्या बोल्डनेसमुळे झाली होती फेमस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 12:07 IST

1 / 8
Actress Antara Mali: बॉलिवूडमध्ये अशा अनेक हिरोईन्स आहेत ज्यांना त्यांच्या एका सिनेमाने खूप ओळख मिळवून दिली. पण नंतर त्या स्क्रीनवरून अशा काही गायब होतात की, त्यांचा काही पत्ताच लागत नाही.
2 / 8
अशीच एक हिरोईन म्हणजे अंतरा माळी. अंतरा माळीला 'कंपनी' सिनेमातून ओळख मिळाली होती. विवेक ओबेरॉयच्या अपोझिट तिने भूमिका केली आणि दोघांनाही पसंत केलं गेलं. पण नंतर अंतरा माळी अशी काही गायब झाली की, दिसलीच नाही. ती आता कुठे आहे आणि काय करते?
3 / 8
अंतरा माळी (Antara Mali) ने 1998 मध्ये 'ढूंढते रह जाओगो' सिनेमातून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. त्यानंतर तिने काही तेलुगू आणि मल्याळम सिनेमे केले. नंतर पुन्हा हिंदी सिनेमाकडे आली.
4 / 8
राम गोपाल वर्माच्या 'कंपनी' सिनेमातून तिला थोडी ओळख मिळाली. त्यानंतर ती 'रोड', 'डरना मना है', 'गायब', 'नाच' , 'मिस्टर या मिस' सारख्या सिनेमात दिसली. पण हे सिनेमे फार चालले नाही.
5 / 8
कंपनीनंतर तिचा कोणता सिनेमा चर्चेत राहिला असेल तर तो म्हणजे 'मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूं'. या सिनेमाची चर्चा तर खूप झाली, पण बॉक्स ऑफिसवर पडला.
6 / 8
2005 पासून अंतरा माळी सिनेमात दिसली नाही. कारण तिला फार काही यश मिळत नव्हती. सिनेमापासून दूर गेल्यावर अंतराने जीक्यू मॅगझिनचा एडिटर चे कुरियनसोबत 2009 मध्ये लग्न केलं.
7 / 8
अंतरा माळी सोशल मीडियावर अॅक्टिव नसते. लग्नानंतर तिने बॉलिवूड आणि फॅन्सपासून अंतर ठेवलं.
8 / 8
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी