Join us  

सलमान खानला सात वेळा बदलावा लागला त्याच्या ‘लकी’ ब्रेसलेटचा स्टोन, का आहे इतकं खास?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2022 12:51 PM

1 / 8
सलमान खान अलीकडे एक संकटातून थोडक्यात बचावला. होय, वाढदिवसाच्या आधीच त्याला साप चावला. सुदैवानं सुदैवाने साप विषारी नव्हता आणि यामुळे सल्लू बचावला.
2 / 8
याआधीही अशाच अनेक संकटातून सलमान बचावला आहे. आता चमत्कार आहे की चाहत्यांच्या प्रार्थनांचा परिणाम हे आम्हाला ठाऊक नाही. पण काहींच्या मते,सलमानच्या हातात असलेल्या ब्रेसलेटचा हा चमत्कार आहे. सलमानच्या हातात कायम हे ब्रेसलेट दिसतं.
3 / 8
सलमानचे वडिल सलीम खान असं सेम ब्रेसलेट घालायचे आणि लहानपणी सलमान त्याच्यासोबत खेळायचा. सलमान इंडस्ट्रीत आला आणि पापांनी त्याला अगदी तसंच सेम ब्रेसलेट बनवून दिलं.
4 / 8
सलमानच्या ब्रेसलेटमध्ये निळ्या रंगाचा स्टोन आहे. त्या स्टोनला फिरोजा म्हणतात. एका मुलाखतीत सलमानने या ब्रेसलेटची खास बात सांगितली होती.
5 / 8
तो म्हणाला होता, ‘स्टोन दोनच प्रकारचे असतात. जेव्हा कोणतीही निगेटीव्ह एनर्जी तुमच्याकडे येते तेव्हा हा स्टोन ती निगेटीव्ह एनर्जी आपल्याकडे खेचून घेतो. यानंतर या स्टोनमध्ये अक्षरश: शिरा तयार होतात आणि त्याला तडे जातात. हा माझा सातवा स्टोन आहे.
6 / 8
सलमानसाठी हे ब्रेसलेट खूप महत्त्वाचे आहे. तो न चुकता ते घालतो. अगदी इव्हेंट असो की पार्टी त्याच्या हातात हे ब्रेसलेट असतंच असतं.
7 / 8
काही वर्षांपूर्वी सलमान त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर मित्रांसोबत पार्टी करत असताना त्याचं हे ब्रेसलेट हरवलं होतं. सलमान निराश झाला होता. अखेर स्विमिंग पूलमध्ये ते सापडलं होतं. ब्रेसलेट मिळताच सलमानचा चेहरा उजळला होता. या बे्रसलेटशिवाय सलमान बाहेर पडत नाही. अगदी त्याला जीवापाड जपतो.
8 / 8
सलमानचं हे ब्रेसलेट पाहून त्याच्या अनेक चाहत्यांनीही हुबेहुब तसंच ब्रेसलेट बनवून घेतलं. आजही बाजारात याच्या कॉपी विकल्या जातात.
टॅग्स :सलमान खानबॉलिवूड