Virat Anushka Anniversary: विराट कोहलीपेक्षा पत्नी अनुष्का आहे वयाने मोठी, जाणून घ्या दोघांमधलं अंतर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 17:30 IST
1 / 9Virat Kohli Anushka Sharma Anniversary: टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा म्हणजे देशातील Hot & Fit कपलपैकी एक. ११ डिसेंबरला ते लग्नबंधनात अडकले.2 / 9अनेक तरूणींचा क्रश असलेल्या विराटच्या लग्नाला आज पाच वर्ष पूर्ण झाली. विराट आणि अनुष्का यांनी आजच्या दिवशी २०१७ साली लग्नगाठ बांधली होती.3 / 9विराट-अनुष्का जोडी आपलं एकमेकांवरील प्रेम नेहमीच जाहीरपणे व्यक्त करताना दिसतात. पण तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का, की विराट कोहलीपेक्षा त्याची पत्नि अनुष्का शर्मा वयाने मोठी आहे. त्यांच्यात नक्की किती अंतर आहे, जाणून घेऊया.4 / 9आज अनुष्का आणि विराट यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने दोघांनीही एकमेकांना खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.5 / 9अनुष्काने विराटचे काही Unseen Photos शेअर केले आहेत. विराटने मात्र नेहमीप्रमाणेच अतिशय रोमँटिक अंदाजात आपल्या 'लेडी लव्ह'ला शुभेच्छा दिल्या आहेत.6 / 9आम्हा दोघांसाठीही आजच्यापेक्षा आणखी कोणता खास दिवस असू शकतो, अशा आशयाचे कॅप्शन लिहून अनुष्काने या दिवसाच्या विराटला शुभेच्छा दिल्यात.7 / 9पण स्टार क्रिकेटर विराट कोहलीपेक्षा त्याची पत्नी अनुष्का वयाने मोठी आहे ही गोष्ट फार कमी जणांना माहिती आहे.8 / 9विराट कोहलीचा वाढदिवस साऱ्याच क्रिकेटप्रेमींना माहिती आहे. विराटचा जन्म दिल्लीत ५ नोव्हेंबर १९८८ला झाला.9 / 9अनुष्काचा जन्मदेखील १९८८ साली झाला आहे, पण तिची जन्मतारीख १ मे आहे. त्यामुळे अनुष्का ही विराटपेक्षा फार नव्हे पण ६ महिन्यांनी मोठी आहे.