1 / 9मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी फरार असलेला उद्योजक विजय मल्ल्या आरसीबीने आयपीएल फायनल जिंकल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आला. सुरुवातीला विजय मल्ल्या आरसीबीचा मालक होता. 2 / 9आरसीबीच्या आयपीएल सामन्यांदरम्यान विजय मल्ल्यासोबतच त्याचा लेक सिद्धार्थ मल्ल्याही अनेकदा स्टेडियममध्ये दिसायचा. त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणही अनेकदा आरसीबीला चिअर करताना दिसली. 3 / 9सिद्धार्थ मल्ल्या आणि दीपिकाच्या अफेअरची प्रचंड चर्चा रंगली होती. त्यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. 4 / 9सिद्धार्थ आणि दीपिकाचा एकमेकांना किस करतानाचा फोटोही प्रचंड व्हायरल झाला होता. पण, नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. 5 / 9सिद्धार्थचं वागणं खूप बदलल्यामुळे ब्रेकअप केल्याचं दीपिकाने म्हटलं होतं. 'मी आमचं नातं वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्याचं वागणं बदललं होतं. जेव्हा आम्ही शेवटचे ताज हॉटेलमध्ये भेटलो तेव्हा डिनरचं बिल त्याने मला भरायला लावलं होतं. ते माझ्यासाठी अपमानकारक होतं', असं दीपिका म्हणाली होती. 6 / 9सिद्धार्थ मल्ल्याचा जन्म अमेरिकेतील लॉस अॅजिंल्स शहरात झाला. तर त्याचं शिक्षण लंडनमध्ये झालं आहे. सध्या तो लॉस अॅजिंल्समध्ये स्थित आहे. 7 / 9सिद्धार्थ त्याच्या वडिलांप्रमाणेच लक्झरियस आयुष्य जगतो. त्याने मॉडेलिंग आणि अभिनयातही आपलं नशीब आजमावलं होतं. पण, त्याला यश मिळालं नाही. 8 / 9गेल्याच वर्षी सिद्धार्थने त्याची गर्लफ्रेंड जास्मिनसोबत लग्न केलं. त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 9 / 9सिद्धार्थ मॉडेलिंग, बिजनेस यामधून पैसे कमावतो. त्याच्याकडे जवळपास ३१७५ कोटींची संपत्ती आहे.