Join us

कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 14:55 IST

1 / 7
विकी कौशलचा आज वाढदिवस. २०२५ मध्ये विकीने 'छावा' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडला धमाकेदार सुरुवात करुन दिली
2 / 7
विकीने काही वर्षांपूर्वी कतरिना कैफसोबत लग्न केलं. विकी आणि कतरिनाची जोडी चाहत्यांची लाडकी जोडी आहे.
3 / 7
विकी कौशल आणि कतरिना एकमेकांच्या आकंठ प्रेमात होते. परंतु कतरिनाशी लग्न करण्यापूर्वी विकी एका अभिनेत्रीच्या प्रेमात होता
4 / 7
ही अभिनेत्री म्हणजे हरलीन सेठी. हरलीन आणि विकी या दोघांनी कधीही एकमेकांचंं रिलेशनशीप लपवलं नाही. विकीच्या 'उरी' सिनेमाचं जोरदार प्रमोशन हरलीनने केलं होतं.
5 / 7
विकी आणि हरलीन अनेकदा पार्टी आणि इव्हेंटमध्ये एकत्र दिसायचे. परंतु अचानक दोघांचं ब्रेकअप झालं होतं.
6 / 7
विकी आणि हरलीनच्या ब्रेकअपमागे कतरिना कारण असल्याचं मीडियामध्ये छापून आलं. विकीच्या कतरिनासोबत रिलेशनशीपच्या बातम्या बाहेर आल्यावर हरलीनने विकीला अनफॉलो करुन त्याच्याशी दुरावा ठेवला.
7 / 7
विकी-हरलीन दोघांनीही एकमेकांच्या प्रायव्हसीचा मान ठेवला. पुढे विकीने कतरिनाशी लग्न करुन दोघांचा सुखी संसार सध्या सुरु आहे.
टॅग्स :विकी कौशलकतरिना कैफहरलीन सेठी'छावा' चित्रपटबॉलिवूड