Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तुंबाड २'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर; 'हस्तर' पुन्हा एकदा थिएटर्समध्ये प्रलय आणणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 18:30 IST

1 / 10
बॉलिवूडच्या सर्वोत्तम हॉरर थ्रिलर चित्रपटांपैकी एक म्हणजे 'तुंबाड' (Tumbbad). 'तुंबाड' हा सिनेमा २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता.
2 / 10
'तुंबाड' या सिनेमातील हस्तर या राक्षासामुळे प्रेक्षकांना अक्षरश: खिळवून ठेवलं होतं. २०१८ मध्ये 'तुंबाड'ने बॉक्स ऑफिसवर ७ कोटींची कमाई केली होती.
3 / 10
त्यानंतर 'तुंबाड' पुन्हा २०२४ मध्ये प्रदर्शित झाला. पुन्हा प्रदर्शित केल्यानंतर प्रेक्षकांनी पुन्हा तितकंच प्रेम सिनेमाला दिलं.
4 / 10
सोहम शाहची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे ४० कोटींची कमाई करत एक मजबूत कलेक्शन मिळवले.
5 / 10
'तुंबाड' पुन्हा प्रदर्शित झाल्यावर मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे सोहम शाहने सिक्वेलची घोषणा केली.
6 / 10
'तुंबाड'च्या सिक्वेलची घोषणा झाल्यापासून चाहत्यांची उत्सुकता शिगेले पोहचली होती. आता या बहुप्रतिक्षित 'तुंबाड'च्या सिक्वेलबद्दल एक मोठे अपडेट समोर आले आहे.
7 / 10
निर्मात्यांनी अधिकृतपणे 'तुंबाड २' (Tumbbad 2 Release Date Announced) हा पुढील वर्षी ३ डिसेंबर २०२७ रोजी रिलीज होणार असल्याची घोषणा केली आहे.
8 / 10
'तुंबाड २'मध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी झळकणार आहे.
9 / 10
विशेष म्हणजे 'तुंबाड'च्या पहिल्या भागातही नवाझुद्दीन झळकणार होता. परंतु त्यावेळी काही कारणास्तव नवाझुद्दीनला काम करता आलं नाही. त्यामुळे नवाझुद्दीनची ही इच्छा 'तुंबाड २' मध्ये पूर्ण झालीये.
10 / 10
तसेच 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अनिता दाते आता 'तुंबाड २' मध्ये दिसणार आहे.
टॅग्स :तुंबाडबॉलिवूडनवाझुद्दीन सिद्दीकीअनिता दाते